OnePlus Nord CE 3 5G : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही एक महत्त्वाची गरज बनली आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती स्मार्टफोन वापरत आहेत. स्मार्टफोनमुळे जवळपास सर्व कामे सोयीस्कर झाली आहेत.
परंतु मागणी वाढल्याने या फोनच्या किमती वाढल्या आहेत. आता तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. होय, सध्या Amazon वर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला OnePlus Nord CE 3 5G हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येईल. कसे ते जाणून घ्या.
स्वस्तात OnePlus Nord CE 3 5G खरेदीची सुवर्णसंधी
आता सर्वात लोकप्रिय टेक कंपनी OnePlus चा स्मार्टफोन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर 26,999 रुपयांना लिस्ट झालेला आहे. हे लक्षात घ्या की ही किंमत OnePlus Nord CE 3 5G च्या बेस व्हेरिएंट (8GB 128GB) साठी असेल. Amazon वर उपलब्ध असणाऱ्या बँक आणि एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.
जाणून घ्या बँक ऑफर
OnePlus Nord CE 3 5G वर मिळणाऱ्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि OneCard क्रेडिट कार्ड वापरून या स्मार्टफोनची किंमत 2000 रुपयांनी कमी करू शकता. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कमीत कमी 20,799 रुपयांची खरेदी करावी. तसेच आता तुम्हाला HSBC कॅशबॅक कार्ड क्रेडिटसह पेमेंट करून 500 रुपयांची सवलत मिळवता येईल.
जाणून घ्या एक्सचेंज ऑफर
OnePlus च्या या शानदार स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत आतापर्यंतची सगळ्यात मोठी सवलत दिली जात आहे. तसेच ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करून 24,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. त्यामुळे तुम्ही एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा घेऊन तुम्ही हा फोन अवघ्या 2,000 रुपयात (26,999-24,900) खरेदी करू शकता. हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा.
फीचर्स
यामध्ये 6.7-इंचाचा HD डिस्प्ले दिला जात आहे जो 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडण्यात आला आहे. त्याशिवाय याच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 5000mAh पॉवरफुल बॅटरीसह येत आहे. हा स्मार्टफोन Android Oxygen Android 13.1 वर काम करेल.