टेक्नोलाॅजी

OnePlus : वनप्लसच्या ‘या’ स्मार्टफोनवर 3000 रुपयांच्या ऑफरसह इयरबड्सही मिळणार मोफत; नुकताच झालाय लॉन्च…

OnePlus : वनप्लसने या वर्षी लॉन्च केलेल्या मिड-रेंज प्रीमियम स्मार्टफोन OnePlus 12R चा नवीन प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीने काही काळापूर्वीच या फोनचे Genshin Impact मॉडेल लॉन्च केले होते. आता ब्रँडने आपला सनसेट ड्युन कलर लाँच केला आहे. कपंनीने त्याच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल केलेला नाही.

यामध्ये तुम्हाला फक्त नवीन रंग पर्याय मिळेल. हा फोन AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर आणि शक्तिशाली बॅटरीसह येतो. यामध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया…

किंमत

कंपनीने OnePlus 12R ला Sunset Dune कलरमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत 42,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. हा फोन 20 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ICICI बँक कार्ड वापरून तुम्हाला यावर 3000 रुपयांची झटपट सूट मिळेल. यासह वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय OnePlus Buds 3 मिळवू शकतात.

वैशिष्ट्य

फोनच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 6.78-इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले आहे. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 4500 Nits आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रदान करण्यात आला आहे.

स्मार्टफोन ॲल्युमिनियम फ्रेम आणि ग्लास बॅकसह येतो. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 वर काम करतो. यात 16GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे. हँडसेट नवीनतम Android 14 वर आधारित Oxygen OS वर काम करतो.

यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध आहेत. समोर, कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला उर्जा देण्यासाठी, 5500mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे, जी 100W चार्जिंगला समर्थन देते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts