OnePlus Mobile Phones : वनप्लस12R चा नवीन अवतार भारतात लॉन्च झाला आहे. हा नवीन फोनचे हे गेन्शिन इम्पॅक्ट एडिशन आहे. या फोनची रचना खूपच अनोखी आहे. हा नवीन फोन इलेक्ट्रिक थीम फिनिशसह येतो. तसेच Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसरसह येतो आणि यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे.
नवीनतम OnePlus 12R Genshin Impact Edition ची किंमत 16GB RAM/256GB स्टोरेज वेरिएंटसाठी 49,999 रुपये आहे. तर OnePlusचा 8GB रॅम 128GB व्हर्जन 39,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
नवीनतम OnePlus स्मार्टफोन 19 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि Amazon, OnePlus.in आणि निवडक OnePlus स्टोअरमधून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल. तुम्ही OnePlus 12R Genshin Impact Edition One Card वापरून 1,000 च्या सवलतीत तो खरेदी करू शकता. तसेच नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.
कॅमेरा
OnePlus 12R Genshin Impact Edition मध्ये कॅमेरा म्हणून ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे आणि त्यात 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 सेन्सर आहे, तर दुसरीकडे, यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा युनिट आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो आहे. कॅमेरा सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो.
OnePlus 12R 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. हा शक्तिशाली फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह सुसज्ज आहे जो सर्व ग्राफिक्स कार्यांसाठी Adreno 740 GPU सह जोडलेला आहे.
बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी, या OnePlus 12R फोनमध्ये NFC, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3, GPS आणि ड्युअल नॅनो-सिम सेटअप आहे. पॉवरसाठी, OnePlus 12R मध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC चार्जरद्वारे जलद चार्ज केली जाऊ शकते.