OnePlus Watch : OnePlus Watch च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. लॉन्च झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर कंपनीने त्याची किंमत कमी केली आहे.
हे स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक (Midnight Black) आणि मूनलाईट सिल्व्हर (Moonlight Silver) या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे गेल्या वर्षी 15,000 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते.
OnePlus ने त्याची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. OPPO
आणि Amazfit सारख्या ब्रँडचे स्मार्टवॉच भारतीय बाजारात या किमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.कंपनीने या स्मार्टवॉचच्या मूनलाइट सिल्व्हर कलर व्हेरियंटच्या किंमतीत कपात केली आहे. त्याची किंमत 14,999 वरून 13,999 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
त्याच वेळी, त्याच्या मिडनाईट ब्लॅक वेरिएंटची किंमत फक्त 14,999 रुपये आहे. स्मार्ट वॉचची नवीन किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि OnePlus च्या अधिकृत साइटवर अपडेट करण्यात आली आहे.
ही फीचर्स मिळणार
OnePlus च्या या स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 454 x 454 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. याशिवाय, हे स्मार्टवॉच क्रेच रेजिस्ट्रेंट्सफीचर्ससह येते.
या स्मार्टवॉचमध्ये आढळलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात 110 वर्कआउट मोड तसेच जॉगिंग आणि रनिंगसाठी ऑटोमॅटिक डिटेक्शन आहे. याशिवाय, हे स्मार्टवॉच जीपीएस, झोप, तणाव, रक्तातील ऑक्सिजन पातळी (SpO2
) आणि हृदय गती मॉनिटरिंग फीचर्ससह आहे.हे स्मार्टवॉच मर्यादित अॅप्स आणि वॉच फेस ऑफर करते वनप्लस वॉचमध्ये RTOS-style (Real Time Operating System) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचला जोडण्यासाठी Google Play-Store आणि Apple App Store वर एक App देण्यात आले आहे.
एवढेच नाही तर हे वॉच वनप्लस टीव्हीसाठी रिमोट म्हणूनही वापरले जाऊ शकते. कंपनीचा दावा आहे की तो ऑटोमॅटिक टीव्ही बंद करू शकतो. हे घड्याळ IP68 वॉटरप्रूफ आहे आणि 402mAh बॅटरी आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ते दोन आठवडे वापरले जाऊ शकते.