टेक्नोलाॅजी

Online पेमेंट करत असाल तर जाणून घ्या सरकारचा नवा आदेश ! नाहीतर बसणार मोठा आर्थिक फटका ..

Online Payment : देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणत ऑनलाइन व्यवहार होताना दिसत आहे. आज जवळपास प्रत्येक जण घरी बसून ऑनलाइन दिवसाला हजार रुपयांचे व्यवहार करत असेल. देशात सध्या ऑनलाइन पेमेंटसाठी Google Pay, Paytm आणि PhonePe या सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.

मात्र आम्ही तुम्हाला सांगतो सरकारी एजन्सी NPCI म्हणेजच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटसाठी आता नवीन आदेश जारी केला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या NPCI ने काही सूचना दिल्या आहेत ज्याचे वापरकर्त्यांनी पालन केले पाहिजे. यामुळे वापरकर्ते आज देशात मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या बँकिंग फसवणुकीच्या घटना टाळू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

UPI पिन फक्त ऑनलाइन पेमेंट्सच्या डिडक्शनच्या वेळी वापरला जावा.

पैसे मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना UPI पिन टाकण्याची गरज नाही. तुम्ही पेमेंट स्वीकारण्यासाठी UPI पिन वापरत असल्यास तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

पेमेंट स्वीकारणाऱ्या वापरकर्त्यांनी ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी पडताळणी करावी. यासाठी प्राप्तकर्त्याचे नाव तपासणे आवश्यक आहे. पडताळणीशिवाय UPI पेमेंट करणे धोकादायक ठरू शकते.

ऑनलाइन पेमेंट करताना, अॅपच्या पिन पेजवर UPI पिन वापरणे आवश्यक आहे. याशिवाय, UPI पिन इतर कोठेही वापरू नये.

ऑनलाइन पेमेंट करताना QR कोड फक्त पेमेंट करण्यासाठी वापरला जावा.

पेमेंट क्यूआर कोडद्वारे मिळू नये असे करणे धोकादायक ठरू शकते.

ऑनलाइन पेमेंटसाठी स्क्रीन शेअरिंग आणि एसएमएस फॉरवर्डिंग अॅप्स कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार डाउनलोड करू नयेत.

हे थर्ड पार्टी पेमेंट Appsआहेत

Bajaj Finserv Direct Ltd
Bajaj Markets (Finserv Markets)
CoinTab
CRED
Fave (Pinelabs)
Goibibo
Google pay
Groww
Jupiter money


MakeMyTrip
MobiKwik
phonePe
Samsung Pay
Slash
Slice
SuperPay
TataNeu
TimePay

हे पण वाचा :- Post Office Update: भारीच .. ‘या’ योजनेत मिळत आहे 50 लाख रुपये कमवण्याची संधी ! जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts