Oppo A17k : जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. फक्त तुम्हाला याचा लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. ओप्पोने काही दिवसांपूर्वी आपला Oppo A17k हा स्मार्टफोन लाँच केला होता.
आता तुम्ही हा फोन 9499 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. Amazon वर तुम्हाला अशी शानदार सवलत मिळत आहे. 3500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर या फोनची 9499 रुपये किंमत होत आहे. जर तुमच्याकडे बँक ऑफ बडोदाचे कार्ड असेल तर तुम्हाला हा Oppo चा फोन 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. इतकेच नाही तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 9 हजार रुपयांनी कमी करता येईल.
जाणून घ्या Oppo A17k चे शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा Oppo A17k स्मार्टफोन 3 GB LPDDR4x रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह येत आहे. कंपनीने यात प्रोसेसर म्हणून IMG GE8320 सह MediaTek Helio G35 चिपसेट दिला गेला आहे. तर वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी कंपनी या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.
कंपनीच्या या शक्तिशाली फोनमध्ये 4 GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करणारा बेस्ट इन सेगमेंट डिस्प्ले दिला आहे. हा फुल एचडी डिस्प्ले 6.56 इंचाचा असून जो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले 600 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तुमच्यासाठी 5000mAh ची बॅटरी उपल्बध करून दिली आहे.
ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. इतकेच नाही तर Oppo चा हा बजेट फोन ColorOS 12.1 वर काम करतो. तर यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 5, मायक्रो यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ 5.3 आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे शानदार पर्याय दिले आहेत.