टेक्नोलाॅजी

Oppo Reno 8 Pro अगदी तुमच्या बजेटमध्ये; लॉन्चपूर्वी जाणून फीचर्स

Oppo Reno 8 : Oppo पुढील आठवड्यात भारतात आपले नवीन Reno 8 रीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo ने पुष्टी केली आहे की ते 18 जुलै रोजी Oppo Reno 8 सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo Reno 8 सीरिजचे दोन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro लाँच होण्यापूर्वी या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊ सर्व माहिती. आज आम्‍ही तुम्‍हाला Oppo Reno 8 स्‍मार्टफोनची भारतातील किंमत, वैशिष्‍ट्ये आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती देणार ​​आहोत.

Oppo Reno 8 किंमत

Oppo Reno 8 स्मार्टफोनची किंमत Passionategeekz ने शेअर केली आहे. हा स्मार्टफोन भारतात 44,999 रुपयांना मिळणार आहे. ही किंमत Oppo च्या अधिकृत वेबसाइटवर शेअर करण्यात आली आहे.

Oppo Reno 8 वैशिष्ट्य

-90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच FHD AMOLED डिस्प्ले
-मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 प्रोसेसर
-12GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्यंत
-4,500mAh बॅटरी, 80W जलद चार्ज
-50MP 2MP 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा
-32MP सेल्फी कॅमेरा
-Android 12 वर आधारित ColorOS 12.1

OPPO Reno 8 स्मार्टफोनच्या भारतात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.43-इंचाचा फुल-एचडी एमोलेड डिस्प्ले असेल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर दिला जाईल. Oppo चा हा फोन Android 12 वर आधारित कंपनीच्या कस्टम UI ColorOS 12.1 वर चालेल.

कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर OPPO Reno 8 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा दिला जाईल, जो Sony चा IMX 766 इमेज सेन्सर आहे.प्राथमिक कॅमेर्‍यासोबत, फोनमध्ये 2MP BW सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. Oppo च्या या फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा असेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts