टेक्नोलाॅजी

6 GB रॅम आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी असणारा रियलमीचा हा फोन स्वस्तात घेण्याची संधी! या ठिकाणी मिळत आहे भन्नाट डील

Realme Narzo N61 Smartphone:- तुम्हाला उत्तम अशी फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल व कमीत कमी तुमचा बजेट दहा हजाराच्या आत असेल तर तुमच्या करता अमेझॉनकडून एक अप्रतिम अशी डील सध्या देण्यात आली आहे व या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वस्तामध्ये चांगला फोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

ॲमेझॉनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या डीलच्या माध्यमातून सहा जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला Realme Narzo N61 या स्मार्टफोनवर उत्तम असा डिस्काउंट मिळत असून यामध्ये पाचशे रुपयांच्या कुपन डिस्काउंट सोबतच या स्मार्टफोनची किंमत अवघ्या 8499 रुपये इतकी आहे.

या कुपन सवलतीमुळे हा स्मार्टफोन तुम्हाला 7999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. इतकेच नाही तर यावर बँक ऑफर देखील उपलब्ध असून या ऑफरमध्ये तुम्ही या स्मार्टफोनवर 7.5 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकतात. तसेच या फोनवर तीस रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे.

विशेष म्हणजे या स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील सुरू असून यामध्ये देखील हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. फक्त यामध्ये एक्सचेंज ऑफर च्या दृष्टिकोनातून लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या माध्यमातून मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती कशी आहे? तसेच त्याचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसी वर ते अवलंबून असणार आहे.

Realme Narzo N61 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
कंपनीने या फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिसोल्युशनसह 6.74 इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे व हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो व त्याची ब्राईटनेस पातळी 560 nits इतकी आहे.

हा स्मार्टफोन 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये येतो. तसेच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वर्चुअल रेन सपोर्ट देखील दिला आहे.

याची एकूण रॅम 12 जीबी आहे व 2TB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड देखील सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रोसेसर म्हणून Unisoc T612 चिपसेट दिला आहे व उत्तम फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असून सेल्फी करिता पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच उत्तम पावर बॅकअप करिता या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय फाय, ब्लूटूथ, GPS आणि यूएसबी टाईप सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts