Oppo Reno 13 Smartphone:- मुळात 2025 या नवीन वर्षाची सुरुवातच स्मार्टफोन प्रेमींसाठी एक धमाकेदार स्वरूपाची झाली आहे असे म्हणावे लागेल. या नवीन वर्षामध्ये सुरुवातीलाच काही कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचे परवडणाऱ्या किमतींमध्ये स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि आर्थिक बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करता येईल अशा स्वरूपाच्या संधी निर्माण झाले आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण प्रसिद्ध असलेल्या चिनी टेक कंपनी ओप्पोच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने नवीन स्मार्टफोन सिरीज ओप्पो रेनो 13 भारतामध्ये लॉंच केली आहे
व हा एक मिड बजेट सेगमेंट सिरीज मधील उत्कृष्ट असा स्मार्टफोन असून कंपनीने या सिरीज मध्ये दोन स्मार्टफोन सादर केले आहेत व यातील पहिला म्हणजे रेनो 13 आणि रेनो 13 प्रो हे होय. हे दोन्ही सादर केलेले स्मार्टफोन हे रेनो 12 आणि रेनो 12 प्रो चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.
ओप्पोने सादर केले रेनो 13 आणि रेनो 13 प्रो सिरीज
चिनी टेक कंपनी ओपोच्या माध्यमातून नवीन स्मार्टफोन सिरीज ओप्पो रेनो 13 भारतीय बाजारामध्ये लॉन्च करण्यात आली असून या मिड बजेट सेगमेंटच्या सिरीज मध्ये कंपनीने रेनो 13 आणि रेनो 13 प्रो असे दोन स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन अतिशय स्टायलिश लुक असलेले असून यामध्ये कंपनीने पावरफुल असा सोनी IMX890 सेन्सर सोबत 50 मेगापिक्सल कॅमेरा दिला
आहे व 6.83 इंचाचा 1.5K डिस्प्ले दिला आहे व यामध्ये वापरण्यात आलेला प्रोसेसर देखील पावरफुल आहे. उत्तम पावर करिता मोठी बॅटरी देण्यात आली आहे व धूळ आणि पाणी पासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP 60,IP68 आणि IP69 जे ट्रिपल आयपी रेटिंग दिलेले आहे.
किती आहे किंमत आणि कधीपासून होईल विक्री?
ओप्पो कंपनीने सादर केलेले हे दोन्ही व्हेरीयंट अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून जर आपण यांची किंमत पाहिली तर ओप्पो रेनो 13 ची किंमत 37 हजार 999 पासून सुरू होते तर ओप्पो रेनो 13 प्रो ची किंमत 49 हजार 999 रुपयांपासून सुरू होते.
या दोन्ही मोबाईलची विक्री 11 जानेवारीपासून सुरू झाली आहे. या आधी या स्मार्टफोनची प्री बुकिंग देखील सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे कंपनी लॉन्च ऑफर मध्ये दहा टक्के इन्स्टंट डिस्काउंट देत आहे.