टेक्नोलाॅजी

लवकरच येत आहे ओप्पोचा नवीन फोल्डेबल फोन! मिळू शकतो 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि बरच काही…

Upcoming OPPO Smartphone:- ओप्पो सध्या आपला नवीन फोल्डेबल फोन ओप्पो Find N5 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन साधारणपणे यावर्षी लॉन्च होऊन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीच्या माध्यमातून या फोनच्या लॉन्च तारखे बद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

असे असताना देखील या फोनचे काही वैशिष्ट्ये मात्र लीक झाले आहेत.या लीकनुसार जर बघितले तर कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4- इंचाचा डिस्प्ले देऊ शकते.

तसेच त्याचा इंटरनल डिस्प्ले आठ इंचाचा असू शकतो.हा डिस्प्ले 2K रिझोल्युशनसह एक डिस्प्ले असू शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

यामध्ये मिळू शकतात तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरे
ओप्पो कंपनी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन आठ एक्सट्रीम एडिशन देण्याची शक्यता आहे.तसेच हा फोन सोळा जीबी पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येऊ शकतो.

तसेच फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह 50 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच पावर बॅकअप करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5700mAh बॅटरी देण्याची एक शक्यता आहे व ही बॅटरी 80 वॅट वायर आणि पन्नास वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

Oppo ने नुकताच लॉन्च केला Oppo A5 Pro
ओप्पोने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो A5 प्रो हा स्मार्टफोन नुकताच चीनमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मधील फीचर्स बघितले तर कंपनीने यामध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन मध्ये त्याला लॉन्च केले आहे.

या फोनमध्ये 6.7- इंचाचा फुल एचडी +AMOLED डिस्प्ले दिला आहे व हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये डायमेन्शन 7300 चिपसेट देत आहे

व त्यासोबतच उत्तम फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देखील यामध्ये देण्यात आला आहे व सेल्फी करिता 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts