Portable Water Geyser:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे अंगात हुडहुडी भरेल इतकी थंडी वातावरणामध्ये सध्या पसरलेली आहे. त्यामुळे सकाळी सकाळी आंघोळ करण्यासाठी गरमागरम पाणी मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये अनेक प्रकारच्या उपकरणांचा वापर केला जातो.
यामध्ये प्रामुख्याने बाजारात आलेली वेगवेगळ्या प्रकारचे हिटर्स, गिझर यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. परंतु यामध्ये जर आपण गिझर बद्दल विचार केला तर आपल्याला एका ठिकाणी भिंतीवर इंस्टॉल करणे गरजेचे असते. बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांची गिझर विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
बजाज, हॅवेल्स आणि क्रॉम्प्टन यासारख्या कंपन्यांच्या गिझरच्या किमती खूप जास्त असतात. त्यामुळे प्रत्येकाला ते घेणे शक्य नसते. परंतु बाजारामध्ये असे काही गिझर आलेला आहे की ज्याची किंमत खूप कमी आहेच. परंतु त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला भिंतीवर एका जागी तो इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच हा एक पोर्टेबल गिझर असून तो तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेऊ शकतात. याच गिझर विषयी आपण माहिती घेणार आहोत.
मेलबोन 1 L व्हाईट इन्स्टंट वॉटर गिझर
हा गिझर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकतात. यामध्ये फक्त एक लिटर क्षमता मिळते व त्याची किंमत साधारणपणे 1107 रुपये इतकी आहे. यामध्ये डिस्काउंट मिळाला तर तो तुम्हाला 924 रुपयांना मिळतो. मेलबोन ही कंपनी प्रसिद्ध कंपनी असून सेवेच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार करू शकणार नाहीत. तसेच वीज बचत करण्यासाठी देखील हा गिझर एक चांगला पर्याय आहे.
सीएसआय इंटरनॅशनल 1L इन्स्टंट वॉटर गिझर
हा गिझर तुम्ही ॲमेझॉन वरून ऑर्डर करू शकतात. याची किंमत 2499 रुपये असून तो तुम्ही 48% डिस्काउंट वर 1299 खरेदी करू शकतात. या गिझरमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आलेली असून हा इन्स्टंट गिझर आहे. म्हणजेच यामध्ये खूप लवकर पाणी गरम होते व शॉक प्रूफ बॉडी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही.
कॅन्डेज 1.5 L व्हाइट इन्स्टंट वॉटर गिझर
या गिझरची रचना खूप आकर्षक असून तो तुम्ही फक्त हजार रुपयांना खरेदी करू शकतात. हा पांढऱ्या रंगाचा गिझर असून त्याच्या पांढऱ्या रंगामुळे तो एकदम स्टायलिश दिसतो. तसेच त्याची क्षमता दीड लिटर इतकी आहे.
अशाप्रकारे तुम्ही या तीनही प्रकारचे गिझर कमीत कमी किमतीत व चांगल्या ऑफर मध्ये खरेदी करू शकतात व ताबडतोब गरम पाणी मिळवू शकतात.