Pune Metro News:- आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जात असून अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापरामुळे आता बऱ्याच गोष्टी अतिशय सुलभरित्या वापरणे शक्य झालेले आहे. साधारणपणे जर आपण रेल्वेचा विचार केला तर आपल्याला विजेचे पोल दिसतात व वरती तारांचे नेटवर्क दिसून येते.
परंतु आता शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील जी काही दुसरी मेट्रो आहे ती ज्या ठिकाणाहून धावेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला विद्युततारांचा संच दिसणार नाही किंवा विजेचा पोल दिसणार नाही. परंतु तरीदेखील मेट्रो धावेल. याकरिता एक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून या विशेष प्रणालीला थर्ड रेल प्रणाली असे नाव देण्यात आलेले आहे.
काय आहे थर्ड रेल प्रणाली?
ही जी काही प्रणाली विकसित करण्यात आली आहे तिला थर्ड रेल प्रणाली असे नाव देण्यात आले असून पुण्यामध्ये सर्वप्रथम या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. संबंधीचा एक करार करण्यात आलेला असून यावर ठेकेदार कंपनी व राज्य सरकार यांच्यात तो करार पार पडला आहे व या कराराच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाच्या वापराला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
जर आपण विदेशाचा विचार केला तर या ठिकाणी सर्व मेट्रो या तंत्रज्ञानाच्या साह्याने धावतात व आता भारतात देखील याचा वापर करण्यात येणार आहे व याची सुरुवात पुण्यातून करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस असणार असून या प्रणालीमध्ये मेट्रोला धावण्यासाठी आवश्यक विजेचा पुरवठा हा मेट्रोच्या रुळांमधूनच होणार आहे.
म्हणजेच आता कुठल्याही प्रकारचा विजेचा खांब किंवा तारांचे जाळे तुम्हाला रेल्वे रुळांच्या वरती दिसणार नाही. या थर्ड रेल सिस्टिमला इलेक्ट्रिक रेल किंवा कंडक्टर रेल असे देखील म्हटले जाते. हे एक अर्ध सतत कंडक्टरच्या माध्यमातून ट्रेनला विद्युत पुरवठा करण्याची अत्याधुनिक पद्धत असून ती नेहमीच्या रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनच्या बाजूने समांतर किंवा रुळाच्या मध्ये बसवली जाते.
या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा पुरवला जातो व ही प्रणाली जगभरात मेट्रो गाड्यांना विद्युत पुरवठ्यासाठी प्रभावी सिद्ध झालेली आहे. या प्रणालीमध्ये मेट्रोचे जे काही दोन नियमित रूळ किंवा ट्रॅक असतात त्यांचा समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकला जातो
व त्या मेट्रो गाडीला थेट खालून इलेक्ट्रिक ट्रांजेक्शन पावर पुरवली जाते. या पद्धतीमध्ये ज्या काही मेट्रो धावतात त्यांना विद्युत पुरवठा किंवा विद्युत संपर्क व्हावा याकरिता खालच्या बाजूला एक धातूची पेटी बसवण्यात येते व तिला शूज असे म्हणतात. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रोला अखंड पुरवठा केला जातो.