टेक्नोलाॅजी

QR Code: स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे? कुठे फिरायची गरज नाही! ‘या’ पद्धतीने अगदी आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड

QR Code:- सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने शिरकाव केल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचा आपल्याला अनुभव येत असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता अगदी अवघड गोष्ट देखील ताबडतोब होऊ लागल्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये याचा खूप मोठा फायदा होतो.

उदाहरणच घ्यायचे झाले तर या डिजिटल युगामध्ये तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तरी देखील तुम्हाला आता रोख कॅशची गरज नसून तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने यूपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवहार करू शकतात. यामध्ये पेमेंट स्वीकारण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड देखील वापरले जातात.

हा कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पेमेंट ट्रान्सफर करू शकतात. परंतु या व्यतिरिक्त एखादा कंटेंट शेअरिंग करायचा असेल त्याकरिता देखील आता क्यूआर कोडचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपण पेमेंट करण्यासाठी किंवा एक्सक्लुसिव्ह कंटेंट ऍक्सेस करण्यासाठी क्यूआर कोड वापरला असेल.

परंतु आपल्याला स्वतःचा देखील क्यूआर कोड तयार करता येऊ शकतो. विशेष म्हणजे याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या थर्ड पार्टी क्यूआर कोड जनरेटर ॲप डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. तुम्ही तुमच्या हातातील अँड्रॉइड फोनच्या मदतीने किंवा डेस्कटॉपचा वापर करून कोणत्याही लिंकचा क्यूआर कोड तयार करू शकता.

 हातातील फोनचा वापर करा आणि कोणत्याही लिंकचा क्यूआर कोड जनरेट करा

 अँड्रॉइड फोनच्या मदतीने

1- तुमच्या हातातील स्मार्टफोनचा वापर करून क्यूआर कोड जनरेट करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर क्रोम ब्राऊसर ओपन करावे लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला ज्याकरिता क्यूआर कोड जनरेट करायचा आहे त्या वेबसाईटची किंवा आर्टिकलची लिंक उघडावी लागेल.

3- त्यानंतर संबंधित वेबसाईट आणि आर्टिकलच्या लिंकच्या पुढे दिसणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करावे.

4- डॉट वर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि शेअर ऑप्शन निवडा.

5- त्यानंतर खाली तुम्हाला क्यूआर कोडचा एक ऑप्शन दिसतो व त्या ठिकाणी क्लिक करावे.

6- त्यानंतर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे. अशा सोप्या पद्धतीने तुमचा क्यूआर कोड डाऊनलोड केला जातो होतो व तुम्ही कोणासोबत देखील शेअर करू शकतात.

 डेस्कटॉपच्या मदतीने कसा तयार कराल क्यूआर कोड?

1- यासाठी देखील तुम्हाला अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट आणि आर्टिकलसाठी क्यूआर कोड जनरेट करायचा आहे ती ब्राउजर वर उघडावी.

3- त्यानंतर त्या लिंकच्या पुढे तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करावे.

4- त्यानंतर सेव्ह अँड शेअर ऑप्शन वर क्लिक करावे.

5- त्यानंतर तुम्हाला क्यूआर कोड जनरेट करण्याचा पर्याय मिळतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts