टेक्नोलाॅजी

Ration Card Update: ऑनलाईन अर्ज करा आणि 30 दिवसात घरबसल्या मिळवा रेशनकार्ड! वाचा अर्ज करण्याची पद्धत

Ration Card Update:- कुठल्याही प्रकारचे शासकीय कागदपत्र आपल्याला जेव्हा लागते तेव्हा त्या कागदपत्रासाठी आपल्याला सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारणे क्रमप्राप्त असते. बऱ्याचदा कित्येक महिने जातात तरी आपल्याला आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत मिळत नाही व यामध्ये वेळ आणि पैसा प्रचंड प्रमाणात वाया जातो आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच.

परंतु आता शासनाच्या माध्यमातून अनेक कागदपत्रांविषयीची कामे आता ऑनलाईन करण्यात आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात सरकारी कार्यालयांच्या हेलपाटे मारण्याची झंझट आता संपण्यात जमा आहे. अगदी त्याच पद्धतीने रेशनकार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र असून रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला अनेकदा कार्यालयांच्या चकरा तसेच रेशनकार्ड वेळेत मिळावे यासाठी मध्यस्थांना पैसे देणे इत्यादी प्रकार करावे लागत होते.

परंतु आता या दोन्ही समस्यांपासून सुटका मिळणार असून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून नागरिकांना आता ऑनलाईन रेशनकार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व यामुळे नक्कीच नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

 रेशनकार्ड मिळेल आता ऑनलाईन

रेशन कार्ड संबंधी विभक्त रेशन कार्ड किंवा एखाद्या रेशन कार्ड मधील नावे कमी करणे किंवा नवीन नावे त्याला जोडणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे इत्यादी कामांकरिता आता तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र अथवा ऑनलाईन सुविधा केंद्रांवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे व त्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे लागतात ती तुम्हाला अर्जाला जोडावी लागणार आहेत.

यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपयांच्या आत शुल्क भरावे लागणार असून तुमचा अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने संबंधित विभागाला सादर केला जाणार आहे. हा अर्ज सादर झाल्यानंतर अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला रेशन कार्ड मिळणे शक्य होणार आहे. या रेशनकार्डवर जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी अर्थात सही देखील राहणार आहे त्यानंतर संबंधित लाभार्थ्याला हे रेशन कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे आता नक्कीच शासकीय कार्यालयांचे चकरा मारण्याचे दिवस आता संपण्यात जमा झाले आहेत.

 रेशन कार्डसाठी कसा करता येईल अर्ज?

याकरिता तुमच्या जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.rcms.mahafood.gov.in

या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे व त्यासाठी जे काही कागदपत्रे लागतील ते तुम्हाला अर्जासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. कागदपत्रांमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवासी दाखला म्हणून( सातबारा उतारा किंवा लाईट बिल ),  आधार कार्ड( कुटुंबातील सर्व सदस्यांचे), तुमच्या शेजारचे रेशन कार्ड झेरॉक्स आणि शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन इत्यादी कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत.

 तुम्हाला किती मिळाले रेशन याचा संदेश येईल तुमच्या मोबाईलवर

तसेच शासनाच्या माध्यमातून रेशनच्या बाबतीत देखील महत्वपूर्ण सुविधा करण्यात आली असून तुम्हाला आता धान्य मिळाले नाही किंवा कमी मिळाले अशा तक्रारींना जागा उरणार नाही.कारण प्रत्येक रेशन कार्डधारकाचा आधार क्रमांक आता रेशन कार्डशी लिंक करण्यात आला असल्यामुळे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचा विचार केला तर अशा लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 35 किलो तर जे कुटुंब प्राधान्य कुटुंब श्रेणीत आहेत

त्यांना प्रति व्यक्ती पाच किलो इतके धान्य दिले जाते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. या पद्धतीने आता कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याचा मोबाईल नंबर रेशनकार्डला लिंक केला असेल तर आता रेशन दुकानातून तुम्हाला धान्य मिळाल्यानंतर त्यासंबंधीचा संदेश तुम्हाला काही वेळातच तुमच्या मोबाईलवर मराठीत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला धान्य मिळाले किंवा कमी मिळाले या संबंधीची सगळी माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts