टेक्नोलाॅजी

ई-पीक पाहणी नाही केली तर होईल ‘हे’ नुकसान! अशा पद्धतीने करा तुम्हीच तुमच्या शेताची पिक पाहणी, वाचा ए टू झेड माहिती

ई पिक पहाणी हा एक महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रमातून आता शेतकरी स्वतः शेतातल्या पिकांची पीक पाहणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. सध्या जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी करण्याची म्हणजेच पिकांची नोंद करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2023 असून त्यानंतर तलाठी स्तरावर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत पीक पाहणी केली जाणार आहे.

म्हणजे जे शेतकरी दिलेल्या कालावधीत पीक पाहणी पूर्ण करणार नाहीत त्यांची पिक पाहणी तलाठ्यांना करावी लागणार आहे. परंतु स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद म्हणजेच ईपीक पाहणी  मुदतीत करून घेणे खूप गरजेचे आहे. अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून पीक पाहणी कशी करावी हे माहिती नाही किंवा समजत नाही. त्यामुळे आपण या शेतामध्ये मोबाईल मधून ई-पीक पाहणी कशी करावी इत्यादी बद्दलची या लेखात घेणार आहोत.

 मोबाईलवर अशा पद्धतीने करा पीक पाहणी

1- याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला की पिक पाहणी ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे व त्यानंतर इन्स्टॉल करून घेणे गरजेचे आहे.

2- एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ई पीक पाहणी नावाचे पेज ओपन होतं. त्यानंतर थोडे डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी जी काही आवश्यक माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसते.

3- त्यानंतर महसूल विभागाची निवड करायची आहे.

4- तुम्ही जर यादी एप्लीकेशन वर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी या पर्यावर क्लिक करायचे आहे.

5- नवीन खातेदार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला विभाग, त्यानंतर जिल्हा आणि तालुका व तुमच्या गाव निवडून पुढे जायचे आहे. त्यानंतर तुमचे नाव नमूद करून तुमच्या खाते किंवा गट क्रमांक टाकून खातेदार निवड करायचे आहे.

6- गट क्रमांक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर जमिनीचा गट क्रमांक टाकायचा आहे मग शोधा वर क्लिक करायचे आहे.

7- त्यानंतर त्या त्या गटातील खातेदारांची निवड करायची आहे व खातेदाराचे नाव व खाते क्रमांक तपासून घ्यायचा आहे व समोर जायचं आहे व त्यानंतर तुमच्यासमोर संकेतांक पाठवा नावाच पेज ओपन होईल.

8- त्यानंतर आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्हाला जर नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदल या पर्यावरण बटणावर करून मोबाईल नंबर टाकायचा आहे व पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 अशाप्रकारे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवायची आहे किंवा पीक पाहणी करायचे आहे.

1- नोंदणी झाल्यानंतर होम या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करू शकतात. या ठिकाणी पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि एकूण पोट खराब क्षेत्र त्या ठिकाणी आपोआप येते.

2- यावेळेस तुम्हाला खरीप हंगामाची नोंदणी करायची आहे तर खरीप हंगाम निवडायचा आहे व पिकांचा वर्ग म्हणजेच निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर त्याची निवड करायची आहे. तसेच पिकाचा प्रकार किंवा पिकांची नावे आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकणे गरजेचे आहे.

3- ही माहिती भरल्यानंतर पुढे जलसिंचनाचे

साधन यामध्ये विहीर तसेच तलाव जे असेल ते निवडायचं आहे व त्यानंतर सिंचनाची पद्धत आणि पीक लागवडीची तारीख निवडायचे आहे.

4- त्यानंतर अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर फोटो काढा या पर्यावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. महत्वाचे म्हणजे तुम्हाला फोटो तुमच्या शेतातूनच अपलोड करायचा आहे. त्यामध्ये फोटो काढून झाला की बरोबरची जी काही खूण असते त्यावर क्लिक करायचं आहे.

5- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली जी काही माहिती आहे ती तुमच्यासमोर दाखवली जाते. ती व्यवस्थित तपासून त्यानंतर त्या खालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला टिक करून पुढे जायचे आहे.

6- पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशी सूचना तुम्हाला येते व त्यानंतर ठीक आहे असं म्हणायचं आहे.

7- तुम्हाला जर तुम्ही नोंद केलेल्या पिकांची माहिती पाहिजे असेल तर पिकांची माहिती पहा या पर्यावर क्लिक करून तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती पाहू शकता.

8- त्यानंतर सगळ्यात शेवटी अपलोड या पर्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे.

अशा पद्धतीने तुम्ही बांधावरची झाडे किंवा कायम पडिक जमिनीची नोंद ही करू शकतात.

 पीक पाहणी केल्याने मिळतात हे फायदे

1-हमीभाव किंवा एमएसपी मिळवण्यासाठी फायदेशीर तुम्हाला जर किमान आधारभूत किंमत अर्थात एम एस पी च्या माध्यमातून शेतमाल विकायचा असेल तर त्याकरिता तुमचा एक पिक पाहणीचा डेटा तुमच्या संमतीने वापरला जाऊ शकतो.

2- पीक कर्जाच्या पडताळणी करता उपयुक्त तुम्हाला ज्या पिकावर पीक कर्ज घ्यायचा आहे. तेच पीक तुम्ही तुमच्या शेतात लावले आहे का याची बँक हा पिक पाहणी चा डेटा पाहून पडताळणी करू शकते.बऱ्याच बँका आता पीक कर्जासाठी हाच डेटा वापरत आहेत.

3- पिक विमा योजनेच्या लाभासाठी विम्यासाठी अर्ज करताना तुम्ही जे पीक नोंदवलेले आहेत ते पिक  आणि ई पाहणी पाहणीत नोंदवलेले पीक यामध्ये जर फरक दिसून आला तर पीक पाहणीतील पीक अंतिम गृहीत धरले जाते.

4- नुकसान भरपाई मिळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर भरपाईचा लाभ मिळण्यासाठी देखील ई पीक पाहणी महत्वाची आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts