टेक्नोलाॅजी

Realme Buds Air 5 : सुरु झाली रेडमीच्या नवीन इयरबड्सची विक्री, ‘इतक्या’ स्वस्तात येईल खरेदी करता

Realme Buds Air 5 : जर तुम्ही नवीन इयरबड्स खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Realme Buds Air 5 इयरबड्सची विक्री सुरु झाली आहे. जे तुम्हाला आता खूप कमी किमतीत खरेदी करता येईल. हे इयरबड्स तुम्ही Realme.com, Amazon आणि Flipkart, अधिकृत रिटेल स्टोअरमधून सहज खरेदी करू शकता.

यात कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिली आहेत. कंपनी अनेक दिवसांपासून यावर काम करत होती. जे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे 50dB सक्रिय नॉइज कॅन्सलेशनसह येते, जे सेगमेंटमध्ये सर्वात जास्त आहे. सध्या ते लॉन्च ऑफर अंतर्गत खूप कमी किमतीत खरेदी करता येत आहे. जाणून घ्या फीचर्स, ऑफर आणि किंमत.

जाणून घ्या किंमत

किमतीबद्दल बोलायचे झाले तर Realme Buds Air 5 earbuds ची किंमत 3,699 रुपये इतकी आहे. ते तुम्ही डीप सी ब्लू आणि आर्क्टिक व्हाइट कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. हे शानदार इयरबड्स Realme.com, Amazon आणि Flipkart वरून ऑनलाइन खरेदी करता येतील.

इतकेच नाही तर ग्राहक देशातील अधिकृत रिटेल स्टोअरमधून Realme Buds Air 5 खरेदी करू शकतात. या लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, Realme इयरबड्सवर 200 रुपयांची सवलत मिळत आहे. तसेच सवलतीनंतर, ग्राहकांना Realme Buds Air 5 हे 3,499 मध्ये खरेदी करता येईल.

जाणून घ्या Realme Buds Air 5 ची फीचर्स

Realme Buds Air 5 शक्तिशाली 12.4mm टायटॅनाइज्ड ड्रायव्हर्ससह सुसज्ज असून ते ब्लूटूथ आवृत्ती 5.3 शी सुसंगत आहे. हे IPX5 रेटिंगसह येत ज्यामुळे ते पाणी प्रतिरोधक बनते. ते 50dB सक्रिय आवाज रद्दीकरणासह येते. तसेच यात 45ms सुपर लो लेटन्सी समर्थित आहे.

चार्जिंग

हे Realme Link अॅपसह ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देत असून या इअरबड्समध्ये नाविन्यपूर्ण 6-माइक कॉल नॉइझ कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे, जे गोंगाटाच्या वातावरणातही क्रिस्टल-क्लियर कॉल गुणवत्ता प्रदान करेल. हे इयरबड 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 7 तासांचा प्लेबॅक वेळ देते असा दावा कंपनीने केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts