टेक्नोलाॅजी

Realme C53 : स्वस्तात मस्त! 108MP कॅमेरा असणाऱ्या Realme च्या फोनची पहिली विक्री, ‘इतक्या’ स्वस्तात येईल खरेदी करता

Realme C53 : भारतातील सर्वात आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme ने नुकताच आपला Realme C53 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. जो तुम्हाला खूप स्वस्तात खरेदी करता येईल.

Realme च्या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108MP कॅमेरा मिळेल. त्याशिवाय तुम्हाला इतर भन्नाट फीचर्स मिळतील. किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच तुम्हाला यावर बंपर सूटही मिळत आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून आपल्या नवीन Realme C53 फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंच डिस्प्ले देण्यात येत आहे. हा HD डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 560 nits च्या पीक ब्राइटनेस पातळीला सपोर्ट करेल. तर मिनी-कॅप्सूल या डिस्प्लेला जास्त प्रीमियम बनवते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनी फोनमध्ये 6GB पर्यंत डायनॅमिक रॅम देत आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या स्मार्ट फोनमध्ये Unisoc T612 चिपसेट पाहायला मिळेल.

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तसेच तुम्हाला येथे पोर्ट्रेट सेन्सर देखील यात मिळेल. नवीन स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतकेच नाही तर 2 टीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करणाऱ्या या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली होती. नवीन स्मार्टफोनची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे.

याच्या OS बद्दल बोलायचे झाल्यास तर, हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Realme UI T Edition वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी, ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस तसेच 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आलेत. कंपनीचा हा फोन तुम्हाला चॅम्पियन गोल्ड आणि चॅम्पियन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts