Realme Narzo 60 5G : भारतामध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. मात्र तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हालाही शानदार स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
रियलमी स्मार्टफोन कंपनीकडून त्यांची Narjo 60 सिरीज भारतामध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीकडून Realme Narjo 60 आणि Realme Narjo 60 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी, Realme Narjo 60 5G खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
Realme Narjo 60 5G ची भारतामध्ये विक्री सुरु झाली आहे. यादरम्यान फोनवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांसाठी शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.
Realme Narjo 60 5G या स्मार्टफोनची किंमत 18,000 रुपये आहे. मात्र तुमचे बजेट यापेक्षा देखील कमी असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 1,899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Realme Narzo 60 प्रमुख वैशिष्ट्ये
Realme Narzo 60 या स्मार्टफोनमध्ये 6.43-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6020 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात येत आहे.
Realme Narzo 60 या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 64MP + 2MP असा मागील कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 33W चार्जर देखील देण्यात आला आहे.
Realme Narzo 60 5G ची भारतात किंमत
Realme Narzo 60 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला अनेक प्रकारची सूट दिली जाईल.
Realme Narzo 60 5G विक्री आणि ऑफर
Realme Narzo 60 5G विक्री आजपासून भारतामध्ये सुरु करण्यात आली आहे. Amazon या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर हा स्मार्टफोन विकला जात आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन कार्डद्वारे पेमेंट करून खरेदी केल्यास तुम्हाला यावर विशेष प्रकारची सूट दिली जात आहे.
Realme Narzo 60 5G 8GB + 128GB वेरिएंट वर कंपनीकडून एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर 16,100 रुपयांची एक्सचेंज देन्यत येत असल्याने तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 1,899 रुपयांना खरेदी करू शकता.
Realme Narzo 60 5G 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 18,000 रुपये आहे. मात्र या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देण्यात येत असल्याने कमी बजेट असणाऱ्यांना चांगला फायदा होत आहे. तसेच या ऑफरमुळे पैशांची देखील चांगली बचत होत आहे.