टेक्नोलाॅजी

Tata 1kw Solar Panel: एकदा 30 हजाराची गुंतवणूक करा आणि 25 वर्षे वीज बिलापासून मुक्तता मिळवा! वाचा टाटाच्या 1kw चा खर्च किती येतो?

Tata 1kw Solar Panel:- सोलर एनर्जी अर्थात सौर ऊर्जेचा वापर हा भविष्यकाळासाठी खूप महत्त्वाचा असून येणाऱ्या कालावधीत सौर ऊर्जा वापराशिवाय पर्याय राहणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल स्थापित करण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सौर पॅनल स्थापन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

जर आपण सौर ऊर्जा पॅनल अर्थात सोलर पॅनलचा विचार केला तर भारतामध्ये अनेक कंपन्या सोलर पॅनल  बनवतात. परंतु यामध्ये टाटा कंपनीचा सोलर हा प्रसिद्ध असून हा सोलर पॅनल ब्रँड जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. सोलर पॅनल व्यवसायामध्ये टाटा पॉवर 1989 पासून असून आज लोकांमध्ये सगळ्यात जास्त विश्वास असलेला ब्रँड आहे.

या अनुषंगाने या लेखात आपण टाटाचा एक किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारणपणे किती खर्च येतो? ही व इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत.

 टाटा 1kw सोलर पॅनलची किंमत किती आहे?

यामध्ये घरगुती शिवाय जर व्यावसायिक  क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये साधारणपणे दोन प्रकारच्या सौर यंत्रणा बसवल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे ग्रीड टाय सोलर सिस्टम आणि दुसरी आहे ऑफ ग्रिड सोलर सिस्टम होय. यात ग्रीड टाय सोलर सिस्टममध्ये सोलर पॅनल, सोलर इन्वर्टर तसेच एसीडीबी/ डीसीडीबी, आवश्यक वायर आणि इतर उपकरणे असतात तर ऑफ ग्रीड सोलर सिस्टममध्ये सोलर बॅटरांचा समावेश केलेला असतो.

या दोघांपैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचा सोलर इन्स्टॉल करायचा आहे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. समजा तुमच्या घराचा जर महिन्याचा विजेचा वापर 800 वॉट असेल तर तुमच्याकरिता एक किलोवॅट सोलर सिस्टम फायद्याची ठरते. यामध्ये पॉलीक्रिस्टलाईन आणि मोनोक्रिस्टलाईन सौर पॅनल असतात

व ते केवळ टाटा कडून उत्पादित होतात. या दोघांच्या किमती वेगवेगळ्या असतात. म्हणजेच मोनोक्रिस्टलाईन सोलर पॅनलची जी काही किंमत असते ती पॉलीक्रिस्टलाईन सोलर पॅनलपेक्षा जास्त असते. टाटाच्या 330 किलोवॅटचे तीन सौर पॅनलचा या सिस्टीम मध्ये उपयोग केला जातो

व याची किंमत सुमारे 30 रुपये प्रति वॅट इतकी असते. टाटाच्या एक किलो वॅट सोलर पॅनल सिस्टम बसवण्याची एकूण किंमत पाहिली तर ती अंदाजे 70 हजार रुपये आहे. तुम्हाला जर यामध्ये अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही शासनाच्या रूप-टॉप सोलर योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात

व या माध्यमातून तुम्हाला साधारणपणे तीस हजार रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच जर तुम्हाला 30 हजाराचे अनुदान मिळाले तर तुम्हाला टाटाच्या एक किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारणपणे 40 हजार रुपये खर्च करावा लागेल.

 टाटा एक किलो वॅट सोलर सिस्टम मधील लागणारे इन्व्हर्टरची किंमत किती असते?

या सोलर सिस्टममध्ये टाटा पीसीयू सोलर इन्वर्टर वापरले जाते व याची किंमत वीस हजार रुपये इतकी असते. हे इन्वर्टर ऑन ग्रीड सोलर इन्वर्टर आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts