टेक्नोलाॅजी

Redmi 12 5G : महागडे 5G स्मार्टफोन खरेदी करा अवघ्या 15000 रुपयांना, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या..

Redmi 12 5G : सध्या बाजारात 5G स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. मागणी वाढल्यामुळे त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता तुमच्यासाठी स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे.

तुम्ही आता Amazon सेलमधून हे ब्रँडेड स्मार्टफोन अवघ्या 15000 रुपयांना खरेदी करू शकता. लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या कारण ही ऑफर काही काळापुरती मर्यादित असणार आहे. रेडमीपासून ते सॅमसंगपर्यंत Amazon सेलमधून तुम्हाला हे फोन खरेदी करता येतील.

Redmi 12 5G ऑफर

Redmi 12 5G हा स्मार्टफोन तुम्ही (6GB RAM, 128GB स्टोरेज) 25 टक्के सवलतीनंतर 13,499 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तर SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहार वापरून ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंत 10 टक्के झटपट सवलत मिळवू शकता. तसेच ते त्यांच्या जुन्या स्मार्टफोनची 12,650 रुपयांपर्यंत देवाणघेवाण करून त्याचे मूल्य आणखी कमी करू शकतात.

Realme Narzo N53

Realme Narzo N53 ची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. तर स्टोरेजचा विचार केला तर यात कंपनीने 6GB RAM, 128GB स्टोरेज दिले आहे. तुम्ही 8,999 रुपयांपर्यंतच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण केली तर तुम्हाला किंमत आणखी कमी करता येईल. Realme स्मार्टफोन Unisoc T612 SoC चिपसेटद्वारे समर्थित असून या फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात 50MP चा प्राथमिक कॅमेरा सेन्सर पाहायला मिळेल.

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 ची किंमत Amazon सेल दरम्यान 9,649 रुपये इतकी आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात कंपनीने 6GB RAM, 128GB स्टोरेज दिले आहे. ग्राहकांना त्यांच्या 11,050 रुपायांपर्यंतच्या जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून किंमत आणखी कमी करता येते. यामध्ये ऑक्टा-कोर Samsung Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. तर कॅमेरा सेटअपमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts