Redmi K50i 5G : जर तुम्ही कमी किमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही भन्नाट संधी तुमच्यासाठी आहे. या ऑफरबद्दल कंपनीने ट्विटर हँडल वर माहिती दिली आहे. दरम्यान कंपनी सतत अशा शानदार ऑफर जाहीर करत असते.
कंपनीच्या या ऑफरमुळे तुम्हाला 18,999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की अशी ऑफर काही दिवसांसाठीची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला लगेचच या फोनची खरेदी करावी लागणार आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
कंपनीकडून हा स्मार्टफोन 25,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे. हे लक्षात घ्या की ही किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची आहे. तर हा फोनचा 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.
डिस्काउंटनंतर, 6GB रॅम वेरिएंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 20,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. यावर, Redmi किंवा Xiaomi फोनवर 2000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
त्यामुळे हा स्मार्टफोन 18,999 रुपयांच्या किंमतीत सहज खरेदी करता येईल. तसेच, ICICI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 1500 रुपयांची झटपट सवलत दिली जात आहे.
Redmi K50i मध्ये, तुम्हाला 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात येत असून, जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. तसेच स्क्रीन 650 निट्सच्या पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येते.
यात MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जात आहे.
या फोनची मुख्य लेन्स 64MP ची आहे. तसेच 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा उपलब्ध असून फ्रंटमध्ये कंपनीकडून यात 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात येत आहे. हा फोन 5080mAh बॅटरीसह येतो, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.