Redmi A4 5G Smartphon:- जर आपण भारतामध्ये स्मार्टफोन बाजारपेठ बघितली तर यामध्ये अनेक कंपन्यांनी स्वस्तात मस्त म्हणजेच परवडणाऱ्या किमतींमध्ये स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि हव्या असलेल्या फीचर्सनुसार स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळते.
यामध्ये आपल्याला अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन बाजारात दिसून येतात. तसेच अनेक स्मार्टफोन कंपन्या देखील आता परवडणाऱ्या किमतींमध्ये चांगले फोन लॉन्च करत असल्याने ग्राहकांसाठी देखील हे एक फायद्याचे ठरताना दिसून येत आहे.
याचप्रमाणे जर आपण भारतीय स्मार्टफोन बाजाराचा विचार केला तर यामध्ये रेडमीने आपला नवा रेडमी A4 5G चा लॉन्चिंग द्वारे स्पर्धा तीव्र केली असून या कंपनीने हा फोन 8499 इतक्या सुरुवातीच्या किमतीमध्ये लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन 5G स्मार्टफोन असून तो काही दिवसांनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
कशी आहे या फोनमध्ये बॅटरी आणि प्रोसेसर?
रेडमीने भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये आणलेला रेडमी A4 5G या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये 5160mAh ची मजबूत बॅटरी आणि Qualcomm स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून त्यामुळे हा फोन या किंमत श्रेणीमध्ये इतर स्मार्टफोनला कडवी टक्कर देऊ शकतो.
हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून चार जीबी+ 64 जीबी व्हेरियंटची किंमत 8499 असून या स्मार्टफोनच्या दुसरे व्हेरिएंट 4GB+128GB ची किंमत 9499 रुपये इतकी आहे.
हा स्मार्टफोन 27 नोव्हेंबर पासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.तसेच हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी स्पार्कल पर्पल आणि स्टेरी ब्लॅक अशा दोन आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कशी आहे या फोनची डिझाईन आणि डिस्प्ले?
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.88 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा पीक ब्राईटनेस 600 nits इतका आहे. तसेच या स्मार्टफोनचे रिझोल्युशन बघितले तर ते 1640×720 पिक्सल इतका आहे.
या स्मार्टफोनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे जो Qualcomm Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आलेला आहे.
या स्मार्टफोनच्या चार जीबी रॅम वेरियंटमध्ये 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली असून ही स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. तसेच या फोनला आयपी 52 रेटिंग देण्यात आले आहे.
कसा आहे या स्मार्टफोनमध्ये दिलेला कॅमेरा आणि बॅटरी
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून पन्नास मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला हा फोन उत्तम फोटोग्राफीसाठी एक उत्तम पर्याय आहे. बॅटरीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या स्मार्टफोनमध्ये 5160mAh ती मोठी बॅटरी दिली असून 18W च्या फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.