Redmi Note 12 5G : जर तुम्ही Xiaomi चे नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सेलमधून Xiaomi चे स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
कंपनीने एक शानदार सेल आणली आहे. तुम्हाला या सेलमधून रेडमी नोट 12,Xiaomi 13 Pro आणि Redmi Note 12 5G हे फोन खरेदी करता येईल. आकर्षक बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनससह या फोनची किंमत आणखी कमी करता येईल. पहा सविस्तर.
Redmi Note 12 5G
स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. त्याची मूळ किंमत 23,999 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन 20,999 रुपयांना तुम्हाला खरेदी करता येईल. या शानदार फोनवर 2,000 रुपयांपर्यंतची बँक सवलतही देण्यात येत आहे.
तसेच तुम्हाला एक्सचेंज बोनसमध्ये त्याची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी करता येईल. त्यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा. याच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, यात तुम्हाला 6.67 इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. तर या फोनची बॅटरी 5000mAh असून जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
रेडमी नोट 12
6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 20,999 रुपये इतकी आहे. तो डिस्काउंटनंतर तुम्ही 15,999 रुपयांना सेलमधून खरेदी करता येईल. तसेच तुम्हाला बँक ऑफरमध्ये या स्मार्टफोनची किंमत आणखी एक हजार रुपयांनी कमी करता येईल. हा स्मार्टफोन 2,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करता येईल. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोन स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
तसेच फोटोग्राफीसाठी, तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनमध्ये डिस्प्ले 6.67 इंच असून जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याशिवाय या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi 13 Pro
स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. तर त्याची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी आहे, परंतु सेलमध्ये तुम्ही 79,999 रुपयांना खरेदी करता येईल. समजा तुम्ही ICICI बँक कार्डने पैसे भरले तर तुम्हाला हा फोन 8 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल.
तुम्हाला एक्स्चेंज बोनसमध्ये 10,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळेल. तसेच कंपनी फोनमध्ये 6.73 इंच LTPO 3.0 AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. हा डिस्प्ले 1900 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हलसह येईल. इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सल्सचे तीन कॅमेरे दिले आहेत. या फोनमध्ये दिलेली बॅटरी 4820mAh असून जी 120W चार्जिंगला सपोर्ट करते.