टेक्नोलाॅजी

आता लवकरच प्रतीक्षा संपणार! रेडमीचा हा भन्नाट असा 5G स्मार्टफोन जानेवारीत ‘या’ दिवशी होणार लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Redmi Smartphone:- स्मार्टफोन बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर 2024 या वर्षांमध्ये अनेक नामवंत अशा कंपन्यांनी वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि वेगवेगळ्या किमतीतले स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले व त्याच प्रकारे आता येणाऱ्या 2025 या वर्षांमध्ये देखील अनेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे स्मार्टफोन बाजारात येण्यासाठी तयार आहेत.

2025 या वर्षात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत जर आपण बघितले तर पहिले नाव हे Redmi 14C 5G स्मार्टफोनचे सांगता येईल.

कंपनीच्या माध्यमातून हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे व इतकेच नाही तर या स्मार्टफोनचे फीचर्स देखील लाँच होण्यापूर्वी लिक झाले आहेत. त्यामुळे या लेखात आपण या स्मार्टफोनबद्दल महत्त्वाची माहिती बघू.

भारतात लॉन्च होणार रेडमी 14C 5G स्मार्टफोन
रेडमीचा हा स्मार्टफोन सहा जानेवारी 2025 रोजी भारतात लॉन्च होणार असून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य बघितले तर यामध्ये 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले असेल व ज्यामध्ये 720×1640 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट असेल व मोठ्या स्क्रीनमुळे व्हिडिओ पाहणे आणि गेम खेळण्यांमध्ये वेगळाच आनंद या माध्यमातून मिळेल.

हा फोन अनलॉक करण्यासाठी बाजूला फिंगर प्रिंट सेन्सर दिलेला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसर व अँड्रॉइड v14 वर आधारित HyperOS वर चालेल.

कसा असेल कॅमेरा?
या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल+ दोन मेगापिक्सल+0.08 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 1080p 30 fps फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग सेटअप उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तेरा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

कशी आहे या स्मार्टफोनमध्ये बॅटरी?
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये उत्तम पॉवर बॅकअप करिता 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे व जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल व ही बॅटरी तुम्हाला पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही.

या स्मार्टफोनची इतर वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये चार जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट असेल व उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ तसेच ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट यासारखे वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
जर बघितले तर कंपनीच्या माध्यमातून अजून पर्यंत या स्मार्टफोनची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु लीकनुसार जर बघितले तर हा मिड बजेट सेगमेंट स्मार्टफोन असण्याची शक्यता असून त्याची किंमत दहा ते पंधरा हजार या दरम्यान असू शकते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts