टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy F13 : त्वरा करा!! सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली फोन 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतोय लाभ

Samsung Galaxy F13 : जर तुम्ही कमी किमतीत शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा लाभ तुम्ही घेतला तर तुमची आता हजारो रुपयांची बचत होऊ शकते. फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये तुम्हाला ही ऑफर मिळत आहे.

या सेलमधून तुम्ही Samsung Galaxy F13 हा स्मार्टफोन 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 14,999 रुपये आहे परंतु तो तुम्ही बँक ऑफर तसेच इतर ऑफरमुळे स्वस्तात खरेदी करू शकता.

जाणून घ्या Samsung Galaxy F13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

सॅमसंगच्या या शानदार स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीकडून या आपल्या बजेट फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी एलसीडी वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा फोन 4 GB रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. यात माली G52 GPU सह Exynos 850 चिपसेट प्रोसेसर दिला आहे. तसेच आता तुम्हाला फोनमध्ये सर्वोत्तम-इन-क्लास कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल.

कंपनीच्या या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. तर यात 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा पाहायला मिळेल. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या भन्नाट फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

या फोनच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित OneUi 4.0 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय दिले आहेत. कंपनीचा हा स्मार्टफोन तुम्हाला सनराइज कॉपर, वॉटरफॉल ब्लू आणि नाईटस्की ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts