टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy F34 5G : सॅमसंगच्या नवीन 5G स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात! मिळतेय सर्वात मोठी सवलत, पहा ऑफर

Samsung Galaxy F34 5G : भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने नुकताच आपला Samsung Galaxy F34 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ती बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा फोन 6 GB 128 GB आणि 8 GB 128 GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. जो तुम्हाला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. महत्त्वाचे म्हणजे लॉन्च ऑफरमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला तगड्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

जाणून घ्या Samsung Galaxy F34 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या Samsung Galaxy F34 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 1000 nits इतकी आहे. कंपनी डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 5 देत आहे.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा Samsung 5G फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. यात तुम्हाला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 1TB पर्यंत वाढवता येईल. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून माली-जी68 जीपीयू सह Exynos 1280 चिपसेट दिला आहे.

कंपनीकडून वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यात OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

इतकेच नाही तर कंपनी या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देत ​​असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याच्या OS बद्दल बोलायचे झाल्यास फोन Android 13 वर आधारित OneUI 5.1 वर काम करेल. यामध्ये दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात. तर कनेक्टिव्हिटीसाठी, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 11 5G बँड, 4G LTE, USB टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ 5.2, 3.5 मिमी हेडफोन जॅक, ड्युअल बँड वाय-फाय आणि NFC सपोर्ट सारखे पर्याय मिळतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts