Samsung Galaxy : मोबाईल दुनियेत सध्या सर्वच कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन फोन बाजारपेठेत सादर करत आहेत. अशातच आता फोन कंपनी सॅमसंगने आपली Galaxy A सिरीज मार्केटमध्ये आणली आहे. हा फोन अगदी तुमच्या बाजेमध्ये असल्याचे देखील बोलले जात आहे. या व्यतिरिक्त सॅमसंगचे असे अनेक बजेट फोन आहेत जे भारतीय बाजारात आधीच पाहायला मिळत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग नवीन Galaxy A14 5G स्मार्टफोन मॉडेलवर काम करत आहे. अशा बातम्या येत आहेत की तो लवकरच बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. कारण हा फोन लॉन्च होण्यापूर्वी अनेक वेबसाइट्सवर तो पहिला गेला आहे. Galaxy A14 5G मॉडेल दोन प्रमाणन डेटाबेसवर दिसले. NBTC सूचीमधील Galaxy A14 5G चा मॉडेल क्रमांक SM-A146P/DSN आहे.
दुसरीकडे, BIS डेटाबेसवर डिव्हाइस SM-A146B/DS मॉडेल क्रमांकासह सूचीबद्ध आहे. मागील लिक्सयामध्ये त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये उघड झाली होती. लीक झालेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, हा नवीन Samsung स्मार्टफोन दोन SoC आवृत्त्यांमध्ये लॉन्च केला जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये Dimensity 700 चिपसेट यूएस मार्केटमध्ये लॉन्च केला जाईल, तर मिड-रेंज Exynos प्रोसेसर इतर देशांमध्ये सादर केला जाऊ शकतो. .
याशिवाय स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. Galaxy A14 5G मध्ये फुल एचडी रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा डिस्प्ले असेल. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
मात्र, कंपनीने या आगामी स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. हा फोन कधी लॉन्च होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.