Samsung Galaxy : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M15 5G लॉन्च केला आहे. हा फोन निवडक बाजारपेठांमध्येच लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये कॅमेरा क्वालिटी खूप उत्तम देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना फोटोची आवड आहे त्यांच्यासाठी हा फोन उत्तम आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य सूचीबद्ध केले आहे. Samsung Galaxy M15 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहिती माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
Samsung Galaxy M15 5G ची वैशिष्ट्ये
Samsung Galaxy M15 5G मध्ये 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि ब्राइटनेस 800 nits पर्यंत आहे. डिझाईनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, Galaxy M15 त्याच्या मागील मॉडेल प्रमाणेच आहे. फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरा आहेत. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Dimensity 6100 प्रोसेसर आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy M15 5G च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे. समोर 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy M15 5G मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. Galaxy M15 5G Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित काम करते.