Samsung OLED Smart TV : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुम्ही सॅमसंगचे नुकतेच लाँच झालेले स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. जर किमतीचा विचार केला तर हे सर्व स्मार्ट टीव्ही तुमच्या बजेटमध्ये सहज खरेदी करू शकता.
सॅमसंगने लॉन्च केलेल्या या स्मार्ट टीव्हीमध्ये नवीन वापरकर्त्यांना OLED स्क्रीन मिळणार आहे. प्रथमच कंपनी OLED स्क्रीन असणारे टीव्ही लाँच केले आहेत. तसेच यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
सॅमसंग लोकप्रिय कंपनीकडून भारतात OLED टीव्ही लॉन्च करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान कंपनी आतापर्यंत भारतात तिच्या प्रीमियम उत्पादनांच्या श्रेणीमध्ये QLED टीव्ही लाँच करत होती. जाणून घेऊया नवीनतम टीव्हीची किंमत आणि फीचर्स.
किंमत
सर्वात महत्त्वाचे म्हणजे LG आणि Sony दीर्घकाळापासून भारतीय बाजारपेठेत त्यांचे OLED टीव्हीची विक्री करत आहे. आता या यादीत सॅमसंगचाही समावेश झाला आहे. कंपनीने OLED टीव्हीच्या दोन श्रेणी – S90C आणि S95C लाँच केले आहेत, ज्यात नवीन वापरकर्त्यांना 55-इंच, 65-इंच आणि 77-इंच स्क्रीन आकार मिळतात. किमतीचा विचार केला तर सॅमसंगने अजूनही सर्व टीव्हीच्या किंमतीचा खुलासा केला नाही.
तसेच नवीन OLED टीव्हीची किंमत 1,69,990 रुपयांपासून सुरू होत असून हे दोन्ही टीव्ही रेंज ऑनलाइन मार्केटमध्ये कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवरच उपलब्ध असणार आहेत. हे टीव्ही ऑफलाइन मार्केटमधील सर्व प्रमुख रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असणार आहेत.
जाणून घ्या फीचर्स
हे दोन्ही Samsung S90C आणि S95C टीव्ही सीरिज OLED पॅनल्ससह येतात. ही उपकरणे एचडीआर प्रमाणित असून कंपनीकडून यात न्यूरल क्वांटम प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सीरिज 4K अपस्केलिंगसह येते. कंपनीच्या मतानुसार, हा प्रोसेसर स्क्रीनवरील व्हिज्युअल्स सतत स्कॅन करत असल्याने तो 4K मध्ये दाखवता येतील.
तसेच कंपनीचा नवीन टीव्ही EyeComfort मोडसह येत असल्याने त्याचा डोळ्यांवर होणारा परिणाम कमी होऊ शकतो. तसेच या टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि ओटीएसचाही सपोर्ट दिला आहे. यात गेमिंगसाठी उच्च फ्रेम दर असून या दोन्ही टीव्ही सिरीज 144Hz रिफ्रेश रेटसह पॅनेलसह येतात.
तसेच यामध्ये गेमिंग कन्सोल सपोर्टही उपलब्ध असून तुम्हाला कोणत्याही गेमिंग कन्सोलवर 144Hz रिफ्रेश रेटचा लाभ देण्यात येत आहे. त्यात टॉप चॅनल ऑडिओ उपलब्ध असून या टीव्हीमध्ये 6 स्पीकर दिले आहेत. यात क्यू सिम्फनी मोड उपलब्ध असून जो टीव्हीच्या स्पीकरला साउंडबारसह सिंक करतो. त्यामुळे वापरकर्त्यांना सर्वोत्तम ऑडिओ अनुभव मिळेल.