टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy : सॅमसंगचा फास्ट चार्जिंगवाला नवीन स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लॉन्च!

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच एक मोठी खुशखबर जाहीर करू शकते. कारण Samsung Galaxy M55 लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फोनबद्दल अनेक माहिती ऑनलाइन समोर आली आहे, ज्यामध्ये डिझाईन, कलर ऑप्शन्स आणि डिव्हाईसच्या अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

टिपस्टर मुकुल शर्मा (@stufflistings) यांनी X वर एका पोस्टमध्ये शेअर केले की Samsung Galaxy M55 मध्ये 12GB RAM सोबत Snapdragon चिपसेट असण्याची अपेक्षा आहे.

असेही म्हटले गेले आहे की हा ‘आतापर्यंतचा सर्वात स्लिम Galaxy M-सिरीज फोनपैकी एक’ असेल. आगामी फोन Samsung Galaxy M54 चा उत्तराधिकारी म्हणून येण्याची शक्यता आहे.

याआधीही याच टिपस्टरने Galaxy M55 मॉडेलचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये असे दिसून आले होते की हा फोन ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगांमध्ये येईल. तसेच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे सांगितले देखील सांगितले जात आहे.

5000mAh बॅटरी

फोन सर्टिफिकेशन साइटवर हा फोन स्पॉट झाला आहे, जिथून असे समोर आले आहे की यात 5000mAh बॅटरी असेल, यामध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग असेल. जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. नवीन फोन 5G, 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ आणि ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येईल अशी अपेक्षा आहे.

Samsung Galaxy M55 च्या मागील गीकबेंच सूचीवरून असे दिसून आले होते की फोन Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 1 SoC सह Adreno(TM) 644 GPU सह लॉन्च होऊ शकतो आणि Android 14 आधारित One UI वर काम करू शकतो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts