Smart TV Offers : बजेट रेंजमध्ये तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑफर उपलब्ध झाला आहे. ज्याच्या फायदा घेऊन अवघ्या 15 हजारात तुम्ही 43 हजारांचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही या ऑफर अंतर्गत 43 इंच स्क्रीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने ही भन्नाट ऑफर दिली आहे. तुम्हाला फ्लिपकार्टवर टेक ब्रँड LEEMA कडून HD रेडी रिझोल्यूशनसह 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही 60% पेक्षा जास्त सवलतीत लिस्टिंग करण्यात आला आहे. बँक कार्ड ऑफरसह यावर अतिरिक्त सवलतींचा लाभ देखील तुम्ही मिळू शकतो.
LEEMA HD Ready LED Smart Android TV (LM4300SFL) ची भारतीय बाजारपेठेत किंमत 42,990 रुपये होती परंतु 65% सवलतीनंतर तो Flipkart वरून 14,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या टीव्हीवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहे आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक देखील मिळेल.
टीव्हीमध्ये HD रेडी (1920×1080) रिझोल्यूशनसह 43-इंचाचा डिस्प्ले आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 178 डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि अंगभूत WiFi कनेक्टिव्हिटी आहे. पावरफुल ऑडिओ अनुभवासाठी यात 20W पावरफुल स्टीरिओ स्पीकर आहेत.
स्मार्ट टीव्ही फीचर्सबद्दल बोलायचे तर, ते Android TV 9 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते आणि कंटेंट स्ट्रीमिंगसाठी Miracast ला समर्थन देते. सपोर्टेड अॅप्सबद्दल बोलायचे झाले तर या टीव्हीमध्ये Prime Video, Netflix, Disney + Hotstar, YouTube आणि Apple TVसपोर्ट आहेत.
हे पण वाचा :- Salman Khan : म्हणून सलमान खान करत नाही लग्न ! कारण जाणून वाटेल तुम्हालाही आश्चर्य