Technology News Marathi : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे अँप मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे माध्यम आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस (Status) ठेवत असतो. मात्र अनेकांना मित्रांनी ठेवलेले स्टेटस स्वतःला ठेवीचे असतात, अशा वेळी तुम्ही स्क्रीनशॉट (Screenshot) घेऊन ठेवत असता.
मात्र आता एक नवीन फीचर आले असून यातून तुम्ही कोणाचेही स्टेटस सहज मिळवू शकता. त्यामुळे आता हे स्टेटस सेव्ह करता येणार आहेत(Save WhatsApp status without taking screenshots).
इन्संट मेसेजिंग व्हॉट्सअॅप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअॅपचे स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झाले असून युजर्सच्या ते आवडीचे आहे. या फीचरच्या मदतीने एखाद्या लिंकपासून ते व्हीडिओ, मीम्स, फोटो, हॉलीडे डेस्टीनेशनसारख्या (videos, memes, photos, holiday destinations) सर्व गोष्टी शेअर करता येतात.
मेसेजिंग अॅपमध्ये स्टेटस सेव्ह करण्याचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र, हे स्टेटस सेव्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत यामुळे स्टेटस सेव्ह करता येईल.
गुगल प्ले स्टोरवरून सर्वप्रथम सेव्हर अॅप डाऊनलोड करा. व्हॉट्सअॅपच्या स्टेटस पेजवर जाऊन यूजरनेमवर टॅप करा. फोनमधील स्टेटस सेव्हर ओपन करा. हे अॅप स्टेटसचा डिस्प्ले स्कॅन करेल. यानंतर व्हिडीओ आणि फोटोंचा एक पर्याय दिसेल. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.
अॅपमध्ये स्टेटसच्या बाजूला युजर्सना डाऊनलोडचा पर्याय दिसेल. डाऊनलोड पर्यायावर क्लिक केल्यास स्टेटस तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होईल.