टेक्नोलाॅजी

Technology News Marathi : WhatsApp युजर्ससाठी महत्वाची बातमी, सेटिंगमध्ये ‘हा’ बदल करा, होईल चांगला फायदा

Technology News Marathi : आजकाल WhatsApp हे माध्यम सर्वात जास्त वापरले जाणार माध्यम आहे. व्हाट्सअँपचे यूजर्स (Users) हे इतर माध्यमांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे.

या माध्यमाचा वापर आपण मेसेज (Sms), फोटो (Photo) किंवा व्हिडीओ (Video) पाठवण्यासाठी करत असतो. एवढंच काय तर तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल (Video call) करुन देखील त्यांची माहिती घेऊ शकतो.

म्हणजेच एखाद्याशी कनेक्ट (Connect) राहण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय मिळतात. परंतु सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर अशी कोणतीही सुविधा नव्हती. सुरुवातीच्या काळात इथे फक्त टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सोय होती. मात्र हळूहळू त्यात बदल करण्यात आले आहेत.

एका रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सऍप कॉलमध्ये प्रत्येक मिनिटाला 720Kb डेटा खर्च होतो. हा डेटा फारसा दिसत नसला तरी त्याचा तुमच्या मोबाइल डेटावर नक्कीच परिणाम होतो.

ज्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतो. अशात हे लोकं हा डेटाचा वापर कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. अशा लोकांना आम्ही एक ट्रीक सांगणार आहोत. जो त्यांना डेटा वाचवण्यात मदत करेल.

जर आपण अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर असाल तर तुम्हाला तुमच्या फोनवर व्हॉट्सऍप ओपन करावे लागेल.

येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात ‘तीन ठिपके’ दिसतील.

आता तुम्हाला मेनूमधील सेटिंगवर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटा पर्यायावर जावे लागेल.

तुम्हाला कॉल्ससाठी कमी डेटा वापरा या पर्यायावर जावे लागेल आणि समोर दिसणारे टॉगल चालू करावे लागेल.

यामुळे WhatsApp कॉलमध्ये खर्च केलेला डेटा कमी होतो. परंतु लक्षात घ्या की व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल ऑडिओ कॉलपेक्षा जास्त डेटा वापरतो, परंतु सध्या असा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान डेटाचा वापर कमी करू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts