OnePlus : Amazon प्राइम डे सेल सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक आहे, ज्यामध्ये विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. अशीच एक ऑफर OnePlus 12 5G वर उपलब्ध आहे, हा फोन एकदम आकर्षक वैशिष्ट्यांसह येतो. या स्मार्टफोन खरेदीवर तुम्ही हजरो रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
ऑफर
हा स्मार्टफोन सध्या Amazon वर 59,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. त्याची मूळ किंमत 64,999 रुपये आहे. म्हणजेच ग्राहकांना 5000 रुपयांची सवलत मिळत आहे. प्राइम डे सेलमध्ये हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात उपलब्ध होईल. यावर अतिरिक्त सवलत असेल.
सर्व सवलतींनंतर, तुम्ही हा स्मार्टफोन 52,999 रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये बँक ऑफर्स आणि इतर फायदे देखील असतील. मात्र ही डील कशी असेल याबाबत कंपनीने जास्त माहिती दिलेली नाही. प्राइम डे सेलमध्ये तुम्ही यावर 12 हजार रुपयांची बचत करू शकाल.
वैशिष्ट्य
OnePlus 12 5G मध्ये 6.82-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 चा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
डिव्हाइस Android 14 वर आधारित ऑक्सिजन OS सह येते. फोनमध्ये 50MP 64MP 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर, कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसमध्ये 5400mAh बॅटरी आहे, जी 100W चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंग आहे.