OnePlus : Amazon 20 ते 21 जुलै दरम्यान भारतात Prime Day सेल आयोजित करणार आहे. या सेल दरम्यान अनेक ऑफर मिळणार आहेत. या ऑफर अंतर्गत OnePlus 12 आणि OnePlus 12R खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत, जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
OnePlus 12 आणि OnePlus 12R वर Amazon प्राइम डे सेल दरम्यान 5,000 रुपयांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे, ज्यामुळे 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 53,000 रुपये आणि 16GB/512GB व्हेरिएंटची किंमत 65,000 रुपये झाली आहे. याशिवाय, ICICI आणि OneCard वापरकर्त्यांसाठी आणखी 7,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
OnePlus 12R वर ऑफर
OnePlus 12R च्या खरेदीवर ग्राहकांना OnePlus Buds विनामूल्य मिळणार आहेत, तसेच ICICI आणि OneCard वापरकर्त्यांसाठी 3,000 रुपयांपर्यंतची सूट देखील उपलब्ध आहे. डिस्काउंटसह, 16GB 256GB व्हेरिएंट 42,999 रुपयांना आणि 8GB 256GB व्हेरिएंट 39,999 रुपयांना खरेदी करता येईल.
त्याचवेळी, 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह येणारा 8GB 128GB व्हेरिएंट 37,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. लॉन्चच्या वेळी, OnePlus 12R च्या 8GB 128GB वेरिएंटची किंमत 39,999 रुपये, 8GB 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आणि 16GB 256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये होती.