टेक्नोलाॅजी

Valentine Day Offer: व्हॅलेंटाइन डे दिवशी होणार हजारोंची बचत ; बंपर ऑफरसह खरेदी करा ‘हा’ पावरफुल स्मार्टफोन

Valentine Day Offer: या व्हॅलेंटाइन डे दिवशी तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरला गिफ्ट करण्यासाठी नवीन स्मार्टफोन शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका मस्त आणि जबरदस्त फिचर असणाऱ्या स्मार्टफोनबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्ही हा स्मार्टफोन व्हॅलेंटाइन डे ऑफर अंतर्गत अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात आणि तुमच्या हजारो रुपयांची देखील सहज बचत करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात दमदार आणि मस्त स्मार्टफोन देणारी OnePlus कंपनीने काही दिवसांपूर्वीच नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 5G भारतात लाँच केला होता. आता तुम्हाला हा बेस्ट स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा दमदार स्मार्टफोन 8 GB रॅम, 128 GB स्टोरेजसह 56,999 रुपयांना खरेदी करू शकतात तर 16 GB रॅम, 256 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 61,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून Amazon वर OnePlus 11 विकत घेतल्यावर तुम्हाला 1,000 रुपयांची सूट मिळू शकते. येथे तुम्हाला ऑफरसोबत एक वर्षासाठी Amazon प्राइम मेंबरशिप मोफत मिळत आहे. यासोबत जिओ फोनवर काही ऑफर्सही देत ​​आहे. याशिवाय Amazon वर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्याद्वारे फोन फक्त 2,723 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, फोनवर 18,950 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही फोन खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

OnePlus 11 5G फीचर्स

प्रोसेसर

OnePlus 11 मध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर बसवला आहे.

कॅमेरा

कंपनीने या नवीन फोनमध्ये Hasselblad कंपनीचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप लावला आहे. यात 50 MP मेन बॅक कॅमेरा, 48 MP दुसरा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 32 MP तिसरा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये पंच होल डिस्प्लेमध्ये 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

डिस्प्ले

Quad HD + Fluid Amoled डिस्प्ले फोनमध्ये 6.7 इंच स्क्रीनवरून उपलब्ध असेल. कंपनीने यामध्ये 120 HZ चा रिफ्रेश रेट दिला आहे.

OS

हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS 13 सह सादर करण्यात आला आहे.

बॅटरी

या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे. फोनमध्ये 100 W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोन 25 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.

वजन

फोनचे वजन 205 ग्रॅम आहे.

इतर फीचर्स 

उत्तम आवाजासाठी, फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉसचे फीचर्स आहे. यात ड्युअल स्पीकर, ड्युअल वायफायसह ब्लूटूथ आहे

रंग 

OnePlus 11 दोन रंगांमध्ये आला आहे जसे की इटर्नल ग्रीन आणि टायटन ब्लॅक.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- Valentine Day 2023 Astro Tips: इच्छित प्रेम मिळविण्यासाठी करा ‘हे’ सोपे ज्योतिषीय उपाय ; होणार फायदा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts