टेक्नोलाॅजी

कमी अंतरासाठी आता मुंबईत ताशी 130 वेगाने धावणार वंदे मेट्रो! वाचा वंदे मेट्रोमध्ये काय आहे इतर ट्रेनपेक्षा विशेष?

देशामध्ये आता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि कामे करण्यात येत असून मोठमोठे शहरांमधील महत्त्वाचे ठिकाणे आणि देशातील महत्त्वाचे शहरांना जोडण्यासाठी अनेक रस्ते आणि रेल्वे प्रकल्प देखील सुरू करण्यात आलेले आहेत.

तसेच रेल्वेच्या माध्यमातून देखील वेगवान आणि आरामदायी प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून वंदे भारत ट्रेनची सुरुवात करण्यात आलेली आहे. याच वंदे भारत ट्रेनचा संदर्भात पुढची पायरी म्हणजे लहान अंतराच्या प्रवासाकरिता खास डिझाईन करण्यात आलेली वंदे मेट्रो ट्रेन होय.

वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ट्रेनची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू असून या महिन्याच्या अखेरीस मुंबईसारख्या शहरापासून वंदे भारत मेट्रो सुरु होईल अशी शक्यता आहे. वंदे भारत मेट्रोचा वेग हा ताशी 130 किलोमीटर राहणार असून एका डब्यामध्ये 100 सीट असणार आहेत.

वंदे भारत मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेसचा एक छोटा प्रकार असून तो आता मुंबई व्यतिरिक्त देशातील इतर ठिकाणी देखील सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमधील उपनगरीय वाहतुकीमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेनची सुरुवात महत्वाची ठरणार आहे.

 काय आहे वंदे मेट्रो आणि इतर ट्रेनमधील विशेष फरक

1- वंदे मेट्रो ही खास करून लहान अंतराच्या व उपनगरीय प्रवासाकरिता खास डिझाईन करण्यात आलेली आहे. शहरामध्ये जलद गतीने प्रवास करण्यासाठी ही फायद्याचे ठरणार आहे. इतर ट्रेन या लांबच्या अंतराच्या प्रवासाकरिता खास डिझाईन केलेले आहेत. परंतु वंदे मेट्रो लहान अंतरासाठी डिझाईन केलेली आहे.

2- वंदे मेट्रोचा वेग हा वेगाने वाढवता देखील येतो आणि वेगाने कमी देखील करता येतो व या क्षमता मुळे ही ट्रेन कमी वेळेत अधिक थांबे कव्हर करू शकते. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होते. परंतु त्या तुलनेमध्ये इतर ट्रेनची गती देखील कमी असते व थांबे देखील कमी असू शकतात.

3- वंदे मेट्रोच्या प्रत्येक डब्यामध्ये स्वयंचलित दरवाजे असणार आहेत व ते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असतील. त्या तुलनेत मात्र इतर ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे नसतात.

4- वंदे मेट्रो ही पूर्णपणे वातानुकूलित असते व प्रवाशांना आरामदायक अनुभव मिळतो.

5- अगदी सुरुवातीला ही ट्रेन 12 डब्यांची असणार आहे व नंतर यामध्ये मागणीनुसार 16 डब्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. इतर ट्रेनचे लांबच्या प्रवासासाठी तयार केलेले असतात व त्यामध्ये अनेक वेगवेगळे वर्ग असतात. वंदे मेट्रोमध्ये तसे नसते.

6- वंदे मेट्रो ट्रेनमध्ये नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून यामध्ये प्रवासात अनेक सोयी सुविधा वाढण्यास मदत होणार आहे. त्या तुलनेत मात्र इतर ट्रेनमध्ये डिजिटल सुविधा खूप कमी असू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts