Vivo Y02t : जर तुम्ही कमी किमतीत विवोचा तगडा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आता तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत Vivo Y02t हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट ऑफर? जाणून घ्या.
आता अशी जबरदस्त संधी तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. या ठिकाणाहून तुम्हाला कंपनीचा बजेट फोन 38% डिस्काउंटसह सहज विकत घेता येईल. या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. सवलतींनंतर तुम्हाला हा फोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
एक्सचेंज ऑफरमध्ये स्मार्टफोनची किंमत 9,350 रुपयांपर्यंत कमी करता येईल. परंतु त्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असावा. इतकेच नाही तर हा स्मार्टफोन 480 रुपयांच्या प्रारंभिक ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.
जाणून घ्या Vivo Y02t चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीकडून Vivo Y02t या फोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51 इंच HD डिस्प्ले देण्यात येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. तर प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट पाहायला मिळेल.
त्याशिवाय वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत असून या स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करत आहे. याच्या OS बद्दल सांगायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, OTG, USB 2.0, GPS आणि Dual SIM सपोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. 186 ग्रॅम वजनाच्या या फोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा असून हा Vivo चा फोन कॉस्मिक ग्रे आणि सनसेट गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.