Vivo Y16 : जर तुम्ही कमी किमतीत शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर amazon सेल खास तुमच्यासाठीच आहे. या सेलमधून तुम्ही हजारो रुपयांची बचत करून कोणताही स्मार्टफोन खरेदी करू शकता. हे लक्षात घ्या की सेल काही दिवसांसाठीच असणार आहे.
या सेलमधून तुम्ही आता विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Vivo Y16 खरेदी करू शकता. ज्याची मूळ किंमत 15,999 रुपये इतकी आहे. परंतु या सेलमध्ये बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि इतर ऑफर्सचा लाभ घेऊन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. मर्यादित काळासाठी सेल असल्याने तुम्हाला लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा लागणार आहे.
जाणून घ्या Vivo Y16 चे जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Vivo Y16 या फोनमध्ये कंपनीकडून 6.51 इंचाचा HD IPS LCD पॅनल देण्यात येत आहे, जो वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येईल. स्टोरेजचा विचार केला तर हा बजेट फोन 4 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Helio P35 चिपसेट पाहायला मिळणार आहे.
तर या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा सोबत 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर Vivo Y16 मध्ये तुम्हाला सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल पाहायला मिळेल.
कंपनीचा हा जबदस्त फोन Android 12 आउट ऑफ द बॉक्सवर आधारित Funtouch OS 12 वर काम करेल. कंपनी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देत असून ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करत आहे. हा Vivo फोन स्टेलर ब्लॅक आणि ड्रिझलिंग गोल्ड अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
त्याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ओटीजी, ड्युअल सिम, जीपीएस आणि एफएम सारखे पर्याय कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत.