टेक्नोलाॅजी

Whatsapp Feature : कमाल फिचर!! आता फोनच्या गॅलरीत दिसणार नाही फोटो-व्हिडिओ, आजच ट्राय करा ‘ही’ ट्रिक

Whatsapp Feature : WhatsApp चे लाखो वापरकर्ते आहेत. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत वेगवेगळे फिचर घेऊन येत असते. असेच एक फिचर WhatsApp ने आणले आहे. ज्याचा फायदा त्याच्या लाखो वापरकर्त्यांना होत आहे.

या फीचरमुळे तुम्हाला WhatsApp चे फोटो आणि व्हिडिओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाही . जर तुम्हाला तुमच्या मित्रांनी पाठवलेलं अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ नको असतील तर तुम्ही हे फिचर वापरू शकता. काय आहे हे फिचर? तुम्ही ते कसे वापरू शकता. जाणून घ्या.

समजा आता तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये ऑटो-डाउनलोडचा पर्याय निवडला असल्यास तुमच्या मित्रांकडून पाठवण्यात आलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होऊ शकतात. या मल्टी-मीडिया फाइल्स तुमच्या स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये दिसू शकतील. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर पाहण्यापूर्वी हे फोटो आणि व्हिडिओ गॅलरीत येतात.

करा हे काम

तुमच्या ग्रुप किंवा चॅटमध्ये येणार्‍या मीडिया फाइल्स तुमच्या गॅलरीमध्ये दिसू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे सहज शक्य आहे. तुम्हाला वैयक्तिक चॅट किंवा ग्रुपवर जाऊन मीडिया दृश्यमानता बदलावी लागणार आहे. त्यासाठी खालील स्टेपचे अनुसरण करा.

whatsapp मीडिया फाइल

1. सर्वात अगोदर तुम्हाला WhatsApp उघडा आणि मुख्य स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसणार्‍या तीन बिंदूंवर टॅप करावे लागणार आहे.
2. या ठिकाणाहून तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन चॅट्स निवडावे लागणार आहे.
3. चॅट्सशी निगडित तुम्हाला सेटिंग्जमध्ये मीडिया व्हिजिबिलिटीचा पर्याय दिसेल आणि समोर दिसणारा टॉगल डिसेबल केला तर, तुम्हाला गॅलरीत व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो आणि व्हिडिओ दिसणार नाही.

ठराविक WhatsApp चॅट किंवा ग्रुप

1. सर्वात अगोदर व्हॉट्सअॅप उघडा आणि चॅट किंवा ग्रुप उघडा.
2. या चॅट किंवा ग्रुपच्या नावावर टॅप केल्यानंतर चॅट इन्फो तुमच्यासमोर येईल.
3. आता या ठिकाणी दिसणार्‍या मीडिया व्हिजिबिलिटी पर्यायावर टॅप केले तर, तुम्हाला तीन पर्याय दिसतील – डीफॉल्ट (होय), होय आणि नाही.
4. जर तुम्ही तिसरा No पर्याय निवडला तर त्या चॅट किंवा ग्रुपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडिओ फोनच्या गॅलरीत जाणार नाहीत.

व्हॉट्सअॅप उघडून तुम्ही हे फोटो आणि व्हिडिओ सहज पाहू शकता. तुमचे व्हॉट्सअॅप लॉक झाले की ते पूर्णपणे खाजगी राहू शकतील. तसेच तुम्ही या मल्टीमीडिया फाइल्स इतर अॅप्सवर किंवा इतरांसोबत तुम्हाला हवे तेव्हा शेअर करता येईल. त्यामुळे तुम्हाला केवळ गोपनीयतेचा लाभ मिळणार नाही तर हे फोटो आणि व्हिडिओ पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts