OnePlus : वनप्लसचा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 4 लवकरच मार्केटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. हा फोन 16 जुलै रोजी मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. अशातच नवीन मॉडेल येण्यापूर्वी जुने मॉडेल सध्या मोठ्या डिस्काउंटसह मिळत आहे. जर तुम्ही वनप्लसचा नवीन फोन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
सध्या OnePlus Nord 3 5G खूप स्वस्त दरात मिळत आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हजारो रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोन सर्वात स्वस्त दरात कुठे उपलब्ध आहे पाहूया…
किंमत
लॉन्चच्या वेळी, त्याच्या 8GB 128GB वेरिएंटची किंमत 33,999 रुपये होती आणि 16GB 256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये होती. हे मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता ते हजारो रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे.
ऑफर
OnePlus Nord 3 5G चे 8GB 128GB व्हेरिएंट (टेम्पेस्ट ग्रे) सध्या Amazon वर फक्त 20,999 रुपये म्हणजेच फ्लॅट 13,000 रुपये कमी किमतीत उपलब्ध आहे. फोनवर कोणतीही बँक ऑफर उपलब्ध नाही पण तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास, तुम्ही त्याची किंमत कमी करू शकता. Amazon या फोनवर 18,450 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे. तथापि, एक्सचेंज बोनसचे मूल्य तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल. तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन नसला तरीही, तुम्हाला 13,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
वैशिष्ट्ये
OnePlus चा हा फोन MediaTek Dimension 9000 chipset ने सुसज्ज आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि HDR10 सपोर्टसह येतो.
फोटोग्राफीसाठी, फोन OIS सह 50-मेगापिक्सेल Sony IMX890 सेन्सर, Sony IMX355 सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे. फोन धूळ आणि पाणी प्रतिरोधक IP54 रेटिंगसह येतो. तसेच फोनमध्ये 5G, 4G LTE, WiFi 6, Bluetooth 5.3, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.