टेक्नोलाॅजी

Smartphone यूजर्स सावधान! ‘हे’ मालवेअर App ताबडतोब करा डिलीट ; नाहीतर होणार बँक खाते रिकामे । Xenomorph App

Xenomorph App :  आज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होत आहे.  यातच आता Google Play Store वर सर्वात धोकादायक अॅप्सपैकी एक App ओळखले गेले आहे. यामुळे जर तुमच्या मोबाईलमध्ये हे app असेल तर तो तुम्ही  ताबडतोब डिलीट करा नाही तर हे app तुमचे बँक तपशील चोरून तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. चला मग जाणून घेऊया त्या app बद्दल संपूर्ण माहिती.

Xenomorph App म्हणजे काय?

झेनोमॉर्फ हे अँड्रॉइड बँकिंग टॉरजन आहे. हा मालवेअर अतिशय धोकादायक आहे जो चतुराईने वापरकर्त्यांचा डेटा चोरतो. हे Google Play Store वर वेगवेगळ्या अॅप्सच्या नावाखाली लिस्टिंग आहे आणि Jimdrop म्हणून ओळखल्या जाणार्‍या ड्रॉपर ऑपरेशनच्या मदतीने पसरले आहे. Xenomorph एक क्लीनर अॅप आहे जे फोनवरील अनावश्यक जागा मोकळी करण्यासाठी कार्य करते. Google Play Store वरून 50 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये ते इंस्टाल केले आहे.

Xenomorph मालवेअर तुमचे बँकिंग तपशील चोरत आहे

ThreatFabric अहवाल देतो की Xenomorph मालवेअर 400 पेक्षा जास्त बँकिंग अॅप्स आणि डिजिटल वॉलेटला लक्ष्य करत आहे. ते तुमच्या संमतीशिवाय व्यवहारही करू शकते. अहवालात असे सांगण्यात आले आहे की त्यांनी स्पेन, अमेरिका आणि तुर्कीच्या वापरकर्त्यांना टार्गेट केले आहे, परंतु लवकरच ते जगभरात पसरू शकते. असे अॅप्स टाळण्यासाठी अँड्रॉइड वापरकर्त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स इन्स्टॉल करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून App  इन्स्टॉल करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

1. अॅप परवानगी तपासणे आवश्यक आहे

तुमच्या फोनमध्ये कोणतेही App डाउनलोड करताना, ते तुमच्याकडून कोणत्या परवानग्या मागतात ते तपासा. तुमची वैयक्तिक माहिती, संपर्क तपशील यासाठी परवानगी घेणार्‍या अॅप्सचे परीक्षण केले पाहिजे.

2. रिव्यु तपासणे आवश्यक आहे

कोणतेही App डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचे रिव्यु तपासा. वापरकर्ते त्यांच्या अनुभवावर आधारित अॅप रिव्युने पोस्ट करतात.

3. डाउनलोडची संख्या पाहणे आवश्यक आहे

धोकादायक असलेले कोणतेही अॅप फक्त काही डाउनलोड असू शकतात. फक्त तेच अॅप्स डाउनलोड करा जे आधीच पुरेशा वेळा डाउनलोड झाले आहेत.

4. App  चे वर्णन वाचणे आवश्यक आहे

Google Play Store अॅप मेकरच्या माहितीसह अॅप तपशील देखील शेअर करते. तुम्ही डेवलपरने डेवलप केलेल्या इतर अॅप्सची सूची पाहण्यासाठी त्याच्या नावावर क्लिक करू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ विश्वसनीय स्त्रोतांकडून अॅप्स इन्स्टॉल करा .

हे पण वाचा :- आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! आता ‘ही’ बंपर सुविधा मिळणार मोफत | Aadhaar Card Update

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts