टेक्नोलाॅजी

Xiaomi 11T Pro 5G : 44% सवलतीसह खरेदी करता येईल 108MP कॅमेरा असणारा 5G फोन, ‘या’ ठिकाणी मिळतेय ऑफर

Xiaomi 11T Pro 5G : सध्या बाजारात 5G स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. परंतु या फोनच्या किमती 4G स्मार्टफोनच्या तुलनेत खूप जास्त आहेत. अशातच जर तुम्ही स्वस्तात 5G फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी आहे.

अशी ऑफर Xiaomi 11T Pro 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे. Xiaomi च्या वेबसाइटवरून तुम्ही 44% सवलतीसह हा फोन खरेदी करू शकता. फोनची मूळ किंमत 52,999 रुपये इतकी आहे. परंतु सवलत मिळाल्यानंतर तो तुम्हाला 29,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी MobiKwik वॉलेट वापरले तर तुम्हाला 20% पर्यंत कॅशबॅक मिळेल.

जाणून घ्या Xiaomi 11T Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीचा जबरदस्त स्मार्टफोन 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येईल. यामध्ये कंपनीकडून प्रोसेसर म्हणून कंपनी Snapdragon X60 5G मॉडेमसह Snapdragon 888 चिपसेट देण्यात येत आहे.

शिवाय कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा AMOLED डॉट डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. जो डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येत आहे. याच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस देखील देण्यात येत आहे.

तर फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले असून कंपनी 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल आणि 108-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह 5-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स दिली आहे. इतकेच नाही तर सेल्फीसाठी कंपनी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा देत आहे.

तसेच लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानासह या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा धमाकेदार स्मार्टफोन 17 मिनिटांत 100% चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे. याच्या OS बद्दल सांगायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts