Xiaomi Smart TV Offer : इतर स्मार्ट टीव्हीपेक्षा Xiaomi आणि Redmi स्मार्ट टीव्हीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु त्याच्या किमतीदेखील खूप जास्त असतात. अशातच जर या कंपनीचे तुम्ही कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत असाल तुमच्यासाठी एक ऑफर आहे.
सध्या Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर एक सेल सुरु आहे. यामध्ये तुम्ही Xiaomi आणि Redmi स्मार्ट टीव्ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर यावर बँक ऑफर आणि इतर ऑफर देखील करून दिल्या उपलब्ध आहेत.
शाओमी स्मार्ट टीव्ही ए सीरीज 32 इंच
शाओमीच्या या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये, हा फोन 50% डिस्काउंटनंतर ते 12,499 रुपयांना खरेदी करता येत आहे. तुम्हाला हा स्मार्टटीव्ही 6 महिन्यांच्या विनाखर्च EMI वर देखील खरेदी करता येईल. हा स्मार्टटीव्ही विनामूल्य इंस्टॉलेशनसह देखील खरेदी करता येतो. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर यात 60Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टटीव्हीचा स्पीकर सेटअप 20W असून तो डॉल्बी ऑडिओलाही सपोर्ट करतो.
Xiaomi Smart TV 5A LED Android TV (2022 मॉडेल)
सध्या हा स्मार्ट टीव्ही कंपनीच्या वेबसाइटवर 50% डिस्काउंटसह खरेदी करता आहे. त्यामुळे त्याची किंमत 24,999 रुपयांवरून 12,499 रुपये इतकी झाली आहे. तसेच ICICI बँक कार्डने पैसे भरून तुम्हाला हा स्मार्टटीव्ही 1500 रुपयांपर्यंत जास्त कमी किमतीत खरेदी करता येईल. इतकेच नाही तर कंपनी Mobikwik वॉलेट पेमेंटवर 20% कॅशबॅक देत आहे. कंपनीचा हा टीव्ही फ्री इन्स्टॉलेशन सुविधेसह येतो. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले पाहायला मिळेल.
Redmi स्मार्ट फायर टीव्ही 32 इंच
किमतीबद्दल बोलायचे झाले तर Redmi च्या या 32 इंची स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. परंतु Xiaomi च्या डीलमध्ये तुम्हाला 54% डिस्काउंट नंतर म्हणजे 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. समजा तुम्ही टीव्ही खरेदी करण्यासाठी MobiKwik वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला 20% कॅशबॅक दिला जाईल. कंपनी या स्मार्ट टीव्हीसोबत मोफत इन्स्टॉलेशन सेवा उपलब्ध करून देत आहे. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, या स्मार्ट टीव्हीमध्ये अलेक्सासोबत अंगभूत व्हॉईस रिमोट असणार आहे. यात शक्तिशाली आवाजासाठी, कंपनीने डॉल्बी ऑडिओसह 20-वॉट स्पीकर दिलेले आहे.