टेक्नोलाॅजी

Xiaomi भारतात लवकरच लॉन्च करणार K सिरीज; जाणून घ्या “या” स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स

Xiaomi : Xiaomi भारतात आपली Redmi K-सिरीज पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 20 जुलै 2022 रोजी भारतात Redmi K50i लाँच करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चची पुष्टी आधीच केली आहे. याआधी, कंपनीने Redmi च्या सीरीजचा शेवटचा फोन Redmi K20 2019 मध्ये भारतात लॉन्च केला होता.

ही कंपनीची प्रीमियम स्मार्टफोन सीरीज आहे. Redmi K50i स्मार्टफोन हा रेडमीचा आतापर्यंत भारतात लॉन्च झालेला सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असेल. हा Xiaomi स्मार्टफोन भारतातील Nothing Phone (1), OnePlus Nord 2T 5G, iQOO Neo 6 आणि Poco F4 5G स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. आज आपण Redmi K50i या स्‍मार्टफोनबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

Redmi K50i लाँच तारीख

Xiaomi ने पुष्टी केली आहे की Redmi K50i स्मार्टफोन 20 जुलै 2022 रोजी भारतात लॉन्च होईल. Xiaomi चा हा स्मार्टफोन Amazon India आणि कंपनीच्या e-store Mi.com तसेच Mi Home Store आणि इतर रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Redmi K50i स्मार्टफोन एका ऑनलाइन इव्हेंटद्वारे भारतात लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनचे भारतातील लॉन्च रेडमी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येणार आहे

Redmi K50i ची किंमत

Redmi K50i स्मार्टफोन 20 जुलै रोजी भारतात लॉन्च होईल. लीक झालेल्या रिपोर्ट्नुसार Xiaomi चा हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला जाईल. या Redmi फोनचे 6GB रॅम मॉडेल 24,000 ते 28,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल. हा फोन 26,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केला जाऊ शकतो.

यासोबतच, Redmi K50i स्मार्टफोनचा 8GB रॅम व्हेरिएंट 31,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल. Redmi K50i स्मार्टफोन भारतात तीन रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध असेल. Steelth Black, Quick Silver आणि Phantom Blue असे कलर असतील. या Redmi फोनची विक्री 22 जुलैपासून सुरू होणार आहे.

Redmi K50i ची वैशिष्ट्ये

-मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 प्रोसेसर
-6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज
-5080mAh बॅटरी 67W फास्ट चार्ज
-6.6-इंचाचा IPS LCD फुल एचडी डिस्प्ले
-64MP 8MP 2MP मागील कॅमेरा
-16MP फ्रंट कॅमेरा

Redmi K50i 5G स्मार्टफोन Redmi Note 11T Pro ची रीब्रँडेड सिरीज असल्याचे म्हटले जात आहे. या रेडमी फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी एलसीडी डिस्प्ले दिला जाईल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144Hz असेल. हा आगामी फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल.

हा फोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर सह सादर केला जाईल. फोनला 5,080mAh ची मजबूत बॅटरी मिळेल आणि 67W फास्ट चार्जिंगसह असेल. यासह, Redmi K50i 5G स्मार्टफोन 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह ऑफर केला जाईल.

Redmi K50i 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनचा फ्रंट कॅमेरा 64MP असेल, ज्यामध्ये 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. Xiaomi च्या या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts