सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाण-घेवाण तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होतेच. परंतु हा सोशल मीडिया अनेक जणांच्या पैसे कमवण्याचे साधन देखील बनलेला आहे. यामध्ये जर आपण youtube चा विचार केला तर हे एक खास महत्त्वाचे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून या माध्यमातून तुम्हाला मनोरंजन तर मिळतेच.
परंतु तुम्ही तुमच्यात असलेले उपजत कौशल्याचा वापर करून स्वतःचे यूट्यूब चैनल सुरू करून देखील या माध्यमातून पैसा मिळवू शकतात. युट्युब वर तुम्ही शैक्षणिक, शेती संबंधित किंवा इतर बऱ्याचशा महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ बनवून ते अपलोड केले तर हा तुमच्यासाठी एक पैसे मिळवण्याचा उत्तम आणि शाश्वत मार्ग म्हणून पुढे येऊ शकतो.
यामुळेच आता यूट्यूबच्या माध्यमातून भारतातील जे काही क्रियेटर्स आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी आता उपलब्ध असणार आहे. आता युट्युब वापरकर्त्यांसाठी कंपनीच्या माध्यमातून एक नवीन फिचर आणि काही खास संधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या नवीन फिचरमुळे आता क्रियेटर्सला युट्युब वर अगदी सहजपणे त्यांचा ब्रांडेड कन्टेन्ट सोशल मीडियावर पोस्ट करू शकणार आहेत.
युट्युबने युजर्स आणि क्रियेटर्ससाठी लॉन्च केले खास फिचर्स
यामध्ये यूट्यूब च्या माध्यमातून पॉडकास्ट आणि दुसरे म्हणजे ब्रांडेड कन्टेन्ट ही दोन फीचर्स लाँच केलेले आहे.
1- कसे असेल पॉडकास्ट– या माध्यमातून तुम्ही एखाद्या विषयावर तुमचे मते मांडणे, एखादी स्टोरी शेअर करणे इत्यादी आणि काही गोष्टी या पॉडकास्टच्या माध्यमातून शेअर करू शकणार आहात. आता क्रियेटर्स करिता त्यांचे प्रोडकास्ट त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या कंटेंट करता पैसे मिळवणे आता सोपे होणार आहे.
तसेच youtube स्टुडिओमध्ये नवीन फिचर देखील आणण्यात येणार असून त्यामुळे आता क्रियेटर्सला त्यांचे पॉडकास्ट युट्युब आणि युट्युब म्युझिक वर सहज प्रकाशित करता येणार आहेत. यामुळे युजर्सला क्रिएटरचे पॉडकास्ट शोधण्यामध्ये व त्यात गुंतवून ठेवण्यामध्ये याची मदत होणार आहे.
तसेच youtube म्युझिक वरील जे काही क्रियेटर्स आहेत त्यांचे प्रॉडकास्ट आता ऑन डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राऊंड मधील गोष्ट ऐकण्यासाठी देखील आता उपलब्ध असणार आहेत. यामुळे आता पॉडकास्ट युट्युब प्लॅटफॉर्म वरील ज्या काही जाहिराती आणि सदस्यता आहे त्या माध्यमातून जास्तीचे कमाई करू शकणार आहेत.
2- कंटेंट मधून पैसे कमावणे– क्रिएटर्स व्यक्तींना त्यांच्या कंटेंट मधून पैसे कमावता यावेत व त्यांचे जे काही प्रेक्षक वर्ग किंवा चाहते आहे त्यांच्याशी कनेक्ट राहता यावे त्यासाठी इतर मार्ग देखील युट्युब च्या माध्यमातून ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे फॅन फंडिंग हा होय.
या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून चॅनल मेंबरशिप किंवा सुपर चॅटद्वारे निर्मात्यांना त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची संधी देते. जर आपण फॅन फंडिंग मधून कमाई करणाऱ्या चैनल ची संख्या पाहिली तर ती डिसेंबर 2020 मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेली आहे.
तसेच तुम्हाला ब्रँडेड कन्टेन्टच्या माध्यमातून पैसा कमवायचा असेल तर त्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे पेड पार्टनरशिप हा होय. जेव्हा क्रियेटर कंटेंट तयार करतात आणि ब्रँड व एजन्सीसह पार्टनरशिप करतात व त्या माध्यमातून क्रिएटर्स लोकांना पैसे मिळतात.
युट्युबने एक ब्रांडेड कन्टेन्ट प्लॅटफॉर्म फीचर लॉन्च केले असून यामध्ये क्रियेटर जाहिरातदार यांची पार्टनरशिप कंपनीच्या प्रमोशनसाठी सुद्धा फायद्याचे ठरेल. या सगळ्यामुळे आता क्रिएटर त्यांच्या खास आणि ब्रांडेड कन्टेन्ट करिता आवश्यक आणि परफेक्ट जाहिरातदार आता शोधू शकणार आहेत.