टेक्नोलाॅजी

सरकारच्या मदतीने घेता येईल मोफत वायफाय व इंटरनेटचा लाभ! कसे वापरू शकतात मोफत इंटरनेट? वाचा माहिती

आजकाल इंटरनेट ही एक महत्त्वाची गोष्ट असून इंटरनेट वापरणे ही सर्वांची गरज झालेली आहे. आज बहुसंख्य कामे हे इंटरनेटच्या साह्याने केली जातात. त्यामुळे इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. जर आपण साधारणपणे पाहिले तर कोरोना कालावधीपासून इंटरनेट वापरामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून येते.

आपल्याला माहित आहे की आपण जो काही रिचार्ज करत असतो त्या प्लॅनमध्ये आपल्याला दीड जीबी किंवा एक जीबी डेटा एका दिवसासाठी दिला जातो. परंतु बऱ्याचदा इंटरनेटवर आधारित कामांचा व्याप इतका असतो की  दिवसभरासाठी उपलब्ध झालेल्या डाटा आपल्याला अपूर्ण पडतो. अशा परिस्थितीत अमर्यादित डेटा किंवा वायफाय वापरणे सोयीचे ठरते.

परंतु यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागू शकतो व यामुळे खिशावर आर्थिक दृष्टिकोनातून ताण येतो. इंटरनेटच्या या डेटा संपण्याच्या समस्ये पासून मुक्तता मिळवण्यासाठी बरेच जण वायफाय बसवण्याचा विचार करतात. जर तुम्हाला देखील अशा पद्धतीने वाय-फाय बसवायचा असेल तर तुम्ही सरकारी ट्रिक्सच्या मदतीने विनामूल्य वायफाय इन्स्टॉल करू शकता. नेमकी यासाठीची पद्धत कशी आहे? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 सरकारी वेबसाईट वरून उपलब्ध होऊ शकते मोफत वायफाय कनेक्शन

जर तुम्हाला तुमच्या घरी किंवा कार्यालयामध्ये वायफाय बसवायचा असेल तर तुम्ही नवीन कनेक्शन अगदी मोफत मिळवू शकतात व एवढेच नाही तर काही महिन्यांकरिता तुम्हाला अगदी मोफत इंटरनेट सुविधा देखील मिळण्याची शक्यता या माध्यमातून मिळते. सरकारच्या संचार साथी या वेबसाईटवरून तुम्हाला मोफत वायफाय सुविधा उपलब्ध होते व या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळू शकणार आहे.

 संचार साथी पोर्टलद्वारे वायफाय कनेक्शन कसे मिळवाल?

1- सगळ्यात अगोदर संचार साथी पोर्टलला भेट देऊन लॉगिन करावे.

2- त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला होम पेजवर अनेक पर्याय दिसतील.

3- या उपलब्ध पर्यायांमध्ये एक पर्याय हा इंटरनेट सेवा पुरवठा दराचा असेल.

4- यामधून तुम्ही नो युवर वायरलाईन इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर वर क्लिक करावे.

5- या ठिकाणी क्लिक केल्यावर एक स्क्रीन ओपन होते व त्यात तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाका.

6- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व ऑपरेटरची यादी दाखवली जाईल. या यादीमध्ये सर्व खाजगी व सरकारी ऑपरेटर तुम्हाला दिसतील.

 अशा पद्धतीने मिळवा मोफत इंटरनेट

वर नमूद केलेली प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्व ऑपरेटर दाखवले जातील व यामध्ये तुम्हाला फ्री वायफाय कनेक्शन आणि फ्री इंटरनेट सुविधाचे पर्याय मिळतील. यामध्ये अनेक कंपन्या तुम्हाला तीन महिन्यांकरिता मोफत इंटरनेट सुविधा देखील देत असतात.

अशा पद्धतीने तुम्ही संचार साथी पोर्टलच्या मदतीने काही महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सुविधा मिळवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts