टेक्नोलाॅजी

Youth Innovation: 3 लिटर डिझेलमध्ये करेल 6 तास काम! बनवला छोट्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि पावर विडर, वाचा किंमत

Youth Innovation:- कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रिकीकरणाचा अंतर्भाव झाल्यामुळे आता शेतीची अनेक कामे कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात करणे शक्य झाले आहे. शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची अंतरमशागत आणि पीक कापणी पर्यंतचे बरीच कामे आता यंत्राच्या साह्याने करता येतात.

कृषी यांत्रिकीकरणांमध्ये ट्रॅक्टरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. पूर्व मशागतीमध्ये नांगरणी किंवा रोटावेटरपासून तर पिकांमधील अंतर मशागतीच्या कामांमध्ये देखील ट्रॅक्टरचलीत इतर यंत्रांचा वापर केला जातो. फळबागाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मिनी ट्रॅक्टरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो.

मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने फळबागांमधील अंतर मशागतीची कामे केली जातात. असाच शेती कामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील उपयुक्त पडेल असे मिनी ट्रॅक्टर आणि पावर विडर एका तरुणाने बनवले असून त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

 तरुणाने बनवले मिनी ट्रॅक्टर आणि पावर वीडर

योगेश नावाच्या तरुणाने ही किमया करून दाखवली असून त्याच्या या प्रयत्नामुळे छोट्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या तरुणांनी खास तंत्रज्ञानाची मदत घेऊन मिनी ट्रॅक्टर विकसित केला असून यामध्ये चार फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर देण्यात आला आहे. साधारणपणे आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर इंजिनला गिअर जोडलेले असतात व त्या माध्यमातून बऱ्याचदा ट्रॅक्टरला आवश्यक ती ताकद मिळवण्यामध्ये अडचणी येतात.

त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी योगेश यांनी इंजिन आणि गिअर  एकमेकांपासून वेगळे ठेवले आहे व चेन व्हीलच्या माध्यमातून त्यांना जोडण्यात आले आहे. नेमका हा बदल केल्यामुळे ट्रॅक्टर चार्जिंग मोटर, पेट्रोल किंवा डिझेल इंजन यापैकी काहीही जोडून तुम्हाला हे ट्रॅक्टर चालवता येते असा दावा योगेश ने केला आहे.

याकरिता तुम्हाला फक्त इंजिनचा जो काही विभाग आहे तो बदलावा लागतो. या मिनी ट्रॅक्टरची क्षमता पाच हॉर्स पावर असून यामध्ये गिअरबॉक्स, डिफरेन्शियल क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, अप आणि डाऊन करण्याकरिता मॅन्युअली हायड्रोलिक यंत्रणा देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे तीन लिटर डिझेलमध्ये हे मिनी ट्रॅक्टर तब्बल सहा तास काम करू शकते.

या मिनी ट्रॅक्टर ला तुम्ही वखर पास जोडून काम करू शकतात किंवा कल्टीवेटर देखील जोडता येते.तसेच या मिनि ट्रॅक्टरला तुम्ही जर पाच फूट आकाराची छोटी ट्रॉली जोडली तर पाच क्विंटल पर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता देखील या ट्रॅक्टरमध्ये आहे.

 किती आहे किंमत?

या मिनी ट्रॅक्टरची किंमत पाहिली तर पाच एचपी डिझेल इंजिन असलेल्या मिनी ट्रॅक्टरची किंमत 75 हजार रुपये आहे व कोणत्याही इंजिन शिवाय हे 55 हजार रुपयात  तुम्हाला मिळते. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पेट्रोल इंजिन किंवा बॅटरी देखील लावू शकतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही तीन बाय पाच फूट आकाराची छोटी ट्रॉली घ्यायचे ठरवले तर ती तुम्हाला 19 हजार पर्यंत मिळते.

 स्वस्तात विकसित केले आहे पावर विडर

तसेच योगेश यांनी मिनी ट्रॅक्टरच नाहीतर आंतरमशागत व तण नियंत्रणाकरिता पावर विडर देखील विकसित केले असून अगदी मिनी ट्रॅक्टर प्रमाणे या पावर विडरमध्ये देखील तुम्ही इंजिनचा विभाग तुमच्या गरजेनुसार बदलू शकतात. त्यामुळे या पावर विडरला तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलच्या साह्याने चालवू शकतात किंवा स्वस्त इंधनाचा वापर देखील यामध्ये करू शकतात. हे पावर विडर देखील तीन लिटर मध्ये साडेपाच ते सहा तास काम करू शकते. याची किंमत 50 हजार रुपये आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts