Pune Rain News : सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख चार विभागांत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
मात्र, पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ प्रदीप राजमाने यांनी वर्तवली आहे.राज्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस ताम्हिणी परिसरात ५६ मिलिमीटर पडल्याची नोंद झाली आहे.
भोर ३४ मि.मी., लवासा ३१ मि.मी., शिरगाव ३० मि.मी., दावडी २८ मि.मी., कोयना २७ मि.मी., डुंगरवाडी २६ मि.मी., अंबोणे २१ मि.मी., भिरा १५ मि.मी., लोणावळा ११ मि.मी., खोपोली १४ मि.मी., शिरोटा १३ मि.मी., खंड ८ मि.मी. तर धारावी ८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.