हवामान

Maharashtra Monsoon Update: लवकरच महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता! अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल, वाचा अपडेट

Maharashtra Monsoon Update: खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे आता शेतकरी बंधू खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून खरीप हंगामाच्या तयारीने वेग पकडला आहे. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर मान्सूनचा अंदाज देखील शेतकऱ्यांना दिलासादायक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची वातावरण आहे. परंतु यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्याचे दिसून येत आहेत. साधारणपणे याबाबतीत हवामान हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार केला तर त्यांच्या मते केरळमध्ये एक जुन ऐवजी चार जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात मान्सून दाखल

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून एक जून म्हणजेच गुरुवारी अरबी समुद्रात दाखल झाला असून दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि कोमोरीन भागामध्ये मान्सूनने चांगले प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहित आहे की मान्सून केरळमध्ये दाखल हा एक जून पर्यंत होत असतो. परंतु यावर्षी मान्सूनचे केरळ येथील आगमन लांबले असून साधारणपणे येत्या रविवार अर्थात चार तारखेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसे पाहायला गेले तर यावर्षी वेळेच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 19 मे रोजी मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर तसेच निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रामध्ये दाखल झालेला होता. परंतु त्या ठिकाणी मान्सून रखडला व त्याची वाटचाल धिमी झाली होती.

30 मे रोजी संपूर्ण अंदमान व निकोबार बेटे समूह आणि अंदमान समुद्रासह पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मानसून दाखल झाला होता व त्यानंतर एक जून रोजी मान्सूनने अरबी समुद्रात बऱ्यापैकी प्रगती केली आहे. एक जून रोजी दक्षिण अरबी समुद्र तसेच मालदीव, दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेला कोमोरीन या भागामध्ये मान्सूनने दस्तक दिली आहे.

एवढेच नाही तर पूर्व- मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये देखील मान्सूनने आगेकूच केलेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर तीन जून अर्थात शनिवार पर्यंत अरबी समुद्राच्या आणखी काही भाग आणि त्यासोबत बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये मान्सून चांगली प्रगती करेल अशी एक शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts